Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनन्या नाही! हार्दिक पांड्या गुपचूप या करोडपती गायिकेसोबत डेटवर; फोटोंनी पोलखोल केली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 09:11 IST

Open in App
1 / 6

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक यांच्या घटस्फोटानंतर पांड्या अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, हार्दिक अनन्याला नाही तर एका ब्रिटीश गायिकेला डेट करत असल्याचे समोर आले आहे. दोघांच्याही एकाचवेळी एकाच ठिकाणी एका रिसॉर्टवर काढलेल्या फोटोंवरून त्यांच्यातील अफेअरची पोलखोल झाली आहे.

2 / 6

हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. लग्नाच्या ४ वर्षांनी दोघे वेगळे झाले होते. आता हार्दिक पांड्या सुट्टीवर असून त्याने श्रीलंकेचा दौराही टाळला होता. तो कशासाठी ते आता समोर आले आहे. हार्दिक पांड्या जास्मिन वालियासोबत डेटवर गेला आहे.

3 / 6

या दोघांनी त्यांच्या इन्स्टावर आपापले फोटो, व्हिडीओ टाकले आहेत. परंतू योगायोग असा की दोघांचेही फोटोतील बॅकग्राऊंड सारखेच आहे. यावरून फॅन्सनी ते दोघे कुठे एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत हे देखील शोधले आहे.

4 / 6

हार्दिक आणि जास्मिन हे दोघे ग्रीसमध्ये सुट्टी घालवत आहेत. जास्मिनने अलीकडेच निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्विमिंग पुलवरील मादक फोटो पोस्ट केला होता. थोड्याच वेळात, हार्दिकने त्याच तलावाभोवती फिरतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तीक्ष्ण नजरेच्या चाहत्यांनी हे हेरले.

5 / 6

त्याहून पुढची बाब म्हणजे जास्मिनने हार्दिकचा हा व्हिडीओ लाईक केला आणि मग सोशल मीडिया सुस्साट सुटला. हार्दिकने तिच्या बिकीनी फोटोवर काही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्याने तिचे अन्य फोटो लाईक केलेले आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे काहीतरी खिचडी शिजतेय, असा अंदाज आता चाहत्यांना आलेला आहे.

6 / 6

'हार्दिक पांड्या आणि तू एकत्र आहात, ग्रीसमध्ये नवीन लव्ह बर्ड्स एन्जॉय करत आहे', 'हार्दिक पंड्या कुठे आहे?' यासारख्या अनेक पोस्ट या दोघांच्या पोस्टखाली येऊ लागल्या आहेत.

टॅग्स :हार्दिक पांड्या