नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली.
या साखरपुड्यानंतर नताशाने आपले स्मिवशुटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नताशाचे हे फोटो आता चांगलेच वायरल झालेले आहेत.
या वायरल झालेल्या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर कमेंटही लिहिल्या आहेत.
हे फोटो पाहून चाहते नताशाला 'भाभी' बोलायला लागले आहेत.
आपल्या साखरपुड्याचा व्हिडीओही नताशाने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
सध्याच्या घडीला हार्दिक आणि नताशा यांचे फोटो चांगलेच वायरल होत असताना दुसरीकडे त्यांना ट्रोलही केले जात आहे.