Mystery Girl, IPL 2022 CSK vs PBKS: MS Dhoniचा CSK संघ हारल्यानंतर आनंदाने जल्लोष करणारी पंजाबची 'ती' खास फॅन कोण, जाणून घ्या

ती आधी 'मुंबई इंडियन्स'ला चीअर करतानाही दिसली आहे.

Mystery Girl, IPL 2022 CSK vs PBKS: 'किंग्ज' संघांच्या लढतीत रविवारी पंजाब किंग्ज संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव केला. पंजाबच्या संघाने दुसरा विजय मिळवत Top4 मध्ये प्रवेश केला.

रविवारी सामना असल्याने या सामन्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. क्रिकेट रसिकांसह अनेक तरूणींनीदेखील स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

चेन्नईला पंजाबने ज्यावेळी पराभूत केले, त्यावेळी पंजाबची एक चाहती आनंदाने जल्लोष करताना दिसली. पंजाबच्या स्टँड्समध्ये बसलेली 'ती' खास फॅन नक्की कोण.. जाणून घेऊया.

पंजाबच्या इतर खेळाडूंच्या कुटुंबांसह स्टँड्समध्ये बसलेली ती तरूणी म्हणजे इशानी चहर. पंजाब किंग्जचा फिरकीपटू राहुल चहर याची ती पत्नी आहे.

राहुलने ९ मार्चला गर्लफ्रेंड इशानीसोबत लग्नगाठ बांधली. राहुल-इशानीचं डेस्टिनेशन वेडिंग ९ मार्चला गोव्यात पार पडलं.

राहुलची पत्नी इशानी ही मूळची बंगळुरूची आहे. इशानी ही एक फॅशन डिझायनर असून राहुलसोबत ती बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती.

राहुलने कालच्या सामन्यात ४ षटके टाकून २५ धावांच्या बदल्यात ३ बळी टिपले. त्यात महेंद्रसिंग धोनीचा महत्त्वाचा बळीही होता.

राहुलने चेन्नईच्या डावाची शेवटची विकेटही घेतली. त्या विकेटनंतर इशानी स्टँड्समध्ये उभी राहून पंजाबचा विजय जल्लोषाने साजरा करत असल्याचं दिसून आलं.

या आधीही राहुल मुंबई इंडियन्सकडू खेळत असताना इशानी त्याला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये नेहमी हजेरी लावत असे. (सर्व फोटो- IPL.com, Instagram)