अमेरिकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला पोलिसांनी केली होती अटक, कारण काय? कोण आहे हरमीत सिंग?

T20 World Cup 2026, Harmeet Singh: सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये शनिवारी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेला सामना कमालीचा अटीतटीचा झाला होता. या सामन्यात अमेरिकन गोलंदाजांनी भेदक मारा करत यजमान भारताला अडचणीत आणले होते. अखेरीस या लढतीत भारतीय संघाचा विजय झाला असला तरी काही अमेरिकन खेळाडूंनी या लढतीतील कामगिरीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अमेरिकेच्या या संघातून मुळचे भारतीय असलेले खेळाडूही खेळत आहेत. त्यापैकी एकाला काही वर्षांपूर्वी चक्क मुंबईत रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.

सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये शनिवारी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेला सामना कमालीचा अटीतटीचा झाला होता. या सामन्यात अमेरिकन गोलंदाजांनी भेदक मारा करत यजमान भारताला अडचणीत आणले होते. अखेरीस या लढतीत भारतीय संघाचा विजय झाला असला तरी काही अमेरिकन खेळाडूंनी या लढतीतील कामगिरीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अमेरिकेच्या या संघातून मुळचे भारतीय असलेले खेळाडूही खेळत आहेत. त्यापैकी एकाला काही वर्षांपूर्वी चक्क मुंबईत रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.

या अमेरिकन खेळाडूचं नाव आहे हरमीत सिंग. हरमीतने परवा भारताविरुद्ध झालेल्या लढतीत सुरेख गोलंदाजी करताना ४ षटकांमध्ये २६ धावा देत २ बळी टिपले होते. त्याने हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलची विकेट काढली होती.

मुंबईत जन्मलेल्या हरमीत सिंगची तुलना एकेकाळी बिशनसिंह बेदी यांच्या गोलंदाजी शैलीशी केली जायची. तो एकेकाळी भारताकडून १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला होता. मात्र पुढे निवडीमध्ये राजकारण होत असल्याचा आरोप करत तो अमेरिकेमध्ये गेला होता. तसेच तिथूनच क्रिकेट खेळू लागला.

हरमीत सिंग याची क्रिकेट कारकीर्द बरीच वादग्रस्त राहिली आहे. तसेच त्याच्यावर एकदा स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. मात्र नंतर बीसीसीआयने त्याला या आरोपांमधून मुक्त केलं होतं.

एवढंच नाही तर नऊ वर्षांपूर्वी त्याला मुंबईत रेल्वे पोलिसांनी अटकही केली होती. याबाबतच्या अधिक माहितीनुसार हरमीत सिंग याच्यावर २०१७ साली अंधेरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कार चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई देखील झाली होती. त्यावेळी आपण रस्ता चुकल्याने प्लॅटफॉर्मवर कार घेऊन गेलो होतो असे सांगितले होते. पुढे पोलिसांनी त्याची सुटका करण्यात आली होती.

दरम्यान, पुढच्या काळात निवड समितीमधील राजकारणाला कंटाळून हरमीत सिंग याने भारत सोडून अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. तसेच तो अमेरिकेमध्ये गेला. या काळात त्याचे वडील आणि आईचं निधन झालं. त्यानंतर त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. पुढे २०२४ मध्ये वर्क परमिट मिळाल्यावर हरमीत सिंग याने अमेरिकन संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.