आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक स्टार खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकूरचाही समावेश आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं पुन्हा एकदा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत.
एवढेच नाही तर त्याची ही खेळी 'अनसोल्ड' टॅग लागल्यावरही त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग सुकर करणारी ठरू शकते. जाणून घेऊया ते कसं शक्य होईल? अन् कोणते संघ त्याच्यावर डाव खेळतील त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
लखनऊच्या ताफ्यात आवेश खान, मयंक यादव, मोहसिन खानसह आकाश दीप आणि शमार जोसेफ या जलगती गोलंदाजांचा समावेश आहे. यातील एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला तर त्यांच्या रिप्लेसमेंटच्या रुपात लखनऊसाठी शार्दुल ठाकूर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात जोफ्रा आर्चरसह संदीप शर्मा, फारुखी, क्वेना मफाकासह तुषार देशपांडेचा समावेश आहे. तुषार देशपांडेच्या दुखापतीचं वृत्तही चर्चेत आले होते. पण गोलंदाजानं त्यात तथ्य नाही असे म्हटले होते. रिप्लेसमेंटचा मुद्दा येईल त्यावेळी राजस्थानचा संघ पहिल्या पसंतीच्या रुपात शार्दुल ठाकूरला पसंती देताना दिसू शकेल.
सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही ऑलराउंडरची तगडी फौज आहे. पण इंज्युरी रिप्लेसमेंटचा मुद्दा आला तर हा संघही पहिली पसंती शार्दुल ठाकूरलाच देईल. कारण वानखेडेच्या मैदानात त्याचा अनुभव या संघाच्या कामी येऊ शकतो.