युवराज हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. २०११च्या विश्वचषकात युवराजची नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली होती.
युवराजने किंग्स इलेव्हन पंजाबकडून आयपीएलच्या हंगामाला सुरुवात केली होती.
पंजाबनंतर युवराज पुणे, हैदराबाद आणि त्यानंतर मुंबईच्या संघात खेळला होता.
गेल्या हंगामात युवराजला कोणीही वाली नव्हता. त्यावेळी युवराजला मुंबईने मदतीचा हात दिला होता.
गेल्या हंगामात युवराज मुंबईकडून एक झंझावाती खेळी खेळला होता. पण त्यानंतर त्याला संघात जास्त संधी देण्यात आली नाही. फिटनेस आणि फॉर्म ही युवराजची समस्या असल्याचे त्यावेळी काही जणांनी सांगितले होते.
आता युवराजला कोणता संघ आपल्या ताफ्यात दाखल करणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.