आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील पहिल्या दोन आठवड्यात युवा खेळाडूंनी आपल्यातील धमक दाखवत यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले. इथं नजर टाकुयात यंदाच्या हंगामात एका रात्रीत स्टार झालेल्या क्रिकेटर्ससंदर्भातील गोष्ट
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाकडून मुकुल चौधरी याने उत्तुंग पटकेबाजीसह सर्वोत्तम फिनिशर असल्याचा ट्रेलर रिलीज केला.
२१ वर्षीय विकेट किपर बॅटरनं सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २७ चेंडूत नाबाद ५४ धावा करत LSG च्या संघाला अशक्यप्राय सामना जिंकून दिला. या खेळीसह तो एका रात्रीत स्टार झाल्याचे पाहायला मिळाले. उर्वरित सामन्यात त्याच्याकडून संघाला याच क्लास शोची अपेक्षा असेल.
२२ वर्षीय कूपर कॉलॉनी याने पंजाब किंग्सच्या संघाने दाखवलेला भरवसा सार्थ ठरवला. पदार्पणाच्या सामन्यात ४४ चेंडूत त्याने नाबाद ७२ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर प्रकाशझोतात आला.
शॉन मार्शला आदर्श मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या युवा बॅटरनं अगदी आपल्या आयडॉलच्या पावलावर पाऊल टाकत IPL मध्ये पदार्पण केले. मार्शप्रमाणे त्यानेही पंजाब किंग्सकडून पदार्पणात अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.
गुजरात टायटन्सच्या संघाकडून खेळणाऱ्या २३ वर्षीय अशोक शर्मानं यंदाच्या हंगामात ताशी १५४.२ कि.मी. वेगाने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला.
गुजरातच्या संघाने फक्त ९० लाखांसह आपल्या संघात घेतलेल्या खेळाडूनं IPL मध्ये आपल्या गोलंदाजीत वेग दाखवत सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील समीर रिझवी याने यंदाच्या हंगामात बॅक टू बॅक फिफ्टीसह आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देत यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी शड्डू ठोकला आहे.
प्रशांत वीर यानेही CSK च्या संघाकडून पदार्पणाच्या सामन्यात आपल्यातील धमक दाखवली. संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आयपीलमधील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूने सातव्या क्रमांकावर २९ चेंडूत केलेली ४३ धावांची खेळी लक्षवेधी ठरली.