बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकमेकांसमोर आयपीएलच्या सामन्यासाठी उभे होते.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली एकमेकांविरोधात जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरले होते.
सामन्यापूर्वी हे दोघे जेव्हा मैदानात भेटले तेव्हा मात्र त्यांच्यामधली मैत्री साऱ्यांना पाहता आली
सामन्यापूर्वी दोन्ही संघ मैदानात सराव करत होते. त्यावेळी सरावानंतर हे दोन्ही कर्णधार एकमेकांना भेटले. फक्त यावरच हे दोघे थांबले नाहीत तर त्यांनी गळाभेटही घेतली.