luxurious cars: धोनीपासून स्मृती मानधनापर्यंत! अलीकडेच या 7 भारतीय खेळाडूंनी खरेदी केली 'आलिशान' कार

SMRiti mandhana: क्रिकेट हा भारतातील सर्वांत श्रीमंत खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधील भारतीय खेळाडूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातील क्रिकेटपटू इतर सेलिब्रिटींप्रमाणेच लक्झरी लाईफ जगत असतात.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी 2022 हे वर्ष क्रिकेटच्या मैदानावर फारसे चांगले गेले नाही. पण हिटमॅनने आलिशान कार खरेदी करण्यामध्ये मोठी रक्कम मोजली आहे. मागील वर्षी त्याने 3.5 कोटी किमतीची लॅम्बोर्गिनी उरूस खरेदी केली.

युवा श्रेयस अय्यरसाठी 2022 हे वर्ष अविस्मरणीय राहिले. 2022 मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून अय्यरकडे पाहिले जाते. कोलकाता नाईट रायडर्सने 2022 च्या आयपीएल मेगा लिलावात 28 वर्षीय अय्यरला तब्बल 12.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले. अय्यरने जून 2022 मध्ये 2.45 कोटी किमतीची मर्सिडीज AMG-63 कार खरेदी केली.

भारताचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीने 2022 हे वर्ष गाजवले. त्याने 1.5 कोटी किमतीची मर्सिडीज GLS 20 खरेदी केली आहे. 2022 मध्ये सूर्याने ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये 1164 धावा केल्या होत्या. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याला एका हंगामाला 8 कोटी एवढे मानधन मिळते.

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने देखील 2022 मध्ये शानदार कामगिरी केली. तिने अलीकडेच 72 लाख रुपयांची रेंज रोव्हर खरेदी केली आहे. खरं तर मराठमोळी स्मृती Hero Motocorp, Boost, Hyundai इत्यादी लोकप्रिय ब्रँड्सची जाहीरात देखील करते.

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने मे 2022 मध्ये 69.9 लाख किमतीची BMW 6 कार खरेदी केली. 2023 च्या आयपीएल मिनी लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्सने 50 लाखांमध्ये खरेदी केले.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील मागील वर्षी कार खरेदी केली. त्याने त्याच्या ताफ्यात एक नवीन SUV Kia EV6 कारचा सामवेश केला. SUV ची किंमत 59.95 लाख एवढी आहे.

भारतीय संघातून सध्या बाहेर असलेल्या शिखर धवनने एक लक्झरी कार खरेदी केली. धवनने एक BMW M8 कार खरेदी केली आहे ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धवनने खरेदी केलेली कार मेटॅलिक ब्लॅक शेडची असून तिची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे.