Join us

'कॅप्टन कूल'चा अव्वल नंबर, धोनीकडून अनेक विक्रम सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:10 IST

Open in App
1 / 9

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराट कोहलीला अखेरच्या चेंडूपर्यंत तणावात ठेवले होते. 6 चेंडूंत 26 धावांचे अंतर धोनीनं 1 चेंडू 2 धावांवर आणल्याने बंगळुरूच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. हातातोंडाशी असलेला घास धोनी हिस्कावेल का, असेच सर्वांना वाटत होते. मात्र, उमेश यादवला सुबुद्धी सुचली आणि त्याने स्लो चेंडू टाकला. यष्टिरक्षक पार्थिव पटेलने पुढचे काम चोख बजावले. त्याने शार्दूल ठाकूरला धावबाद करून बंगळुरूला एका धावेने विजय मिळवून दिला.

2 / 9

या सामन्यात धोनीच्या संघाला पराभव पत्करावा लागला. धोनीनं 175च्या स्ट्राईक रेटनं 48 चेंडूंत 7 षटकार व 5 चौकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली.

3 / 9

आयपीएलमधील धोनीची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. यापूर्वी त्याने 2018मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध मोहालीत केलेली नाबाद 79 धावांची खेळी ही सर्वोत्तम होती. 2019 मध्येच चेन्नईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद 75 धावांची खेळी केली होती.

4 / 9

धोनीनं बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात 7 षटाकारांची आतषबाजी केली. एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही त्याने नावावर केला.

5 / 9

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात धोनीनं आणखी एक विक्रम केला. आयपीएलमध्ये 200 षटकार खेचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या क्रमवारीत ख्रिस गेल ( 323) आणि एबी डिव्हिलियर्स ( 204) आघाडीवर आहेत. धोनीच्या नावावर 203 षटकार आहेत.

6 / 9

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून धोनीचं नाणं खणखणीत वाजलं आहे. कर्णधार म्हणून 4000 धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

7 / 9

चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक 168 षटकारांचा विक्रमही धोनीनं नावावर केला. त्याने सुरेश रैनाच्या 167 षटकारांचा विक्रम मोडला.

8 / 9

धोनीला मॅच फिनिशर का बोलतात, याची प्रचिती घडवणारी आकडेवारी आली आहे. 20व्या षटकात सर्वाधिक वेळा 20 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम धोनीनं नावावर केला.

9 / 9

धोनीनं चारवेळा अशी खेळी केली आहे, तर रोहित शर्माला 3 आणि युवराज सिंग, डेव्हिड मिलर व ख्रिस मॉरिस यांना प्रत्येकी दोनवेळा अशी खेळी करता आली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्स