महेंद्रसिंग धोनीसोबत कपिल देव पुन्हा एकदा उतरले क्रिकेटच्या मैदानावर

भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे दोन्ही कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळाली. दोन्ही दिग्गज मैदानावर एकत्र क्रिकेट खेळत होते.

हा कोणताही क्रिकेट सामना नव्हता, तर एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी हे दोघे विश्वविजेचे कर्णधार एकत्र आले होते. धोनीनं यावेळी तिथं उपस्थित लहान मुलांशी संवादही साधला आणि त्यांना खेळासंदर्भात टीप्सही दिल्या.

शुटिंगच्या वेळी दोन्ही खेळाडूंनी संपुर्ण वेळ फक्त क्रिकेट खेळण्यात घालवला. यावेळी आधी कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनीसाठी गोलंदाजी केली. नंतर भूमिका बदलत धोनीने 1983 चा वर्ल्डकप जिंकून देणा-या कपिल देव यांना गोलंदाजी केली.

दरम्यान, याच मैदानावर 16 नोव्हेंबरपासून भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला कसोटी सामना होणार आहे. यावेळी धोनी आणि कपिल देव यांनी खेळपट्टीची पाहणीही केली.