Join us

ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 00:28 IST

Open in App
1 / 5

५) न्यूझीलंडचा माजी सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये २९ षटकार मारून टॉप ५ मध्ये स्थान मिळवतो. त्याने एक परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

2 / 5

४) श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३ षटकार मारले आहेत आणि तो यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या षटकारांचा करिष्मा आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजा आहे.

3 / 5

३) ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ३६ षटकार मारले आहेत.

4 / 5

२) 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ३९ षटकार मारले आहेत.

5 / 5

१) भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम साधला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात एकूण ४४ षटकार मारले आहेत.

टॅग्स :ऑफ द फिल्डभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया