विराट कोहलीनं लखनौविरुद्धच्या सामन्यातील ४९ धावांच्या खेळीसह यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थान पटकावले आहे. पाच सामन्यात २ अर्धशतकाच्या मदतीने त्याने २२८ धावा केल्या असून ६९ ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हेन्री क्लासेन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. क्लासेन याने सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून ५ सामन्यात २ अर्धशतकाच्या मदचतीने २२४ धावा केल्या आहेत.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण आपल्या जबरदस्त खेळीमुळे चर्चेत आहे. ५ सामन्यातील २ अर्धशतकासह त्याने २२२ धावा केल्या आहेत. तो या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन याने पाच सामन्यातील पाच डावात २ अर्धशतकाच्या मदतीने २१३ धावा केल्या आहेत. ९१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आङे,
१५ वर्षीय वैभव सूर्यंवशी ५ सामन्यातील ५ डावातील २ अर्धशतकासह २०० धावांसह या यादीत टॉप ५ मध्ये आहे. ७७ ही त्याची सर्वोच्च धावंसख्या आहे.
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजीतही भारतीयांचा दबदबा दिसून येतो. गुजरात टायटन्सच्या ताफ्यातील प्रसिद्ध कृष्णानं पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. त्याने ४ सामन्यात १० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
CSK चा जलदगती गोलंदाज अंशुल कंबोज या शर्यतीत कडवी टक्कर देत असून ५ सामन्यातील १० विेकट्स सह तो या यादीत दुसऱ्या स्थानावर दिसतो.
लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय गोलंदाज प्रिन्स यादव ५ सामन्यात ९ विकेट्स घेत टॉप ३ मध्ये पोहचला आहे.
रवी बिश्नोई ५ सामन्यात ९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्सला गोलंदाजीत दमदार सुरुवात करुन देणारा इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चर याने ५ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत.