Join us  

मोहम्मद शमी ऑन फायर! १६ वर्षानंतर भारतात नोंदवला गेला असा पराक्रम, ५ मोठे विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 7:48 PM

Open in App
1 / 6

मोहम्मद शमीने १० षटकांत १ निर्धाव षटक फेकताना ५१ धावांवर ५ विकेट्स घेतल्या. या कामगिरीनसह शमीने अनेक विक्रम नावावर केले. भारताकडून ९३ वन डे सामन्यात सर्वाधिक १७० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मान त्याने पटकावला.

2 / 6

मोहम्मद शमीने आज ५१ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि त्याची ही वन डेतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी २०१९मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध ६९ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याआधी वेस्ट इंडिज ( ४-१६ ) आणि पाकिस्तान ( ४-३५) विरुद्ध त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.

3 / 6

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी ३७ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने अजित आगरकर ( ३६), जवागल श्रीनाथ ( ३३) व हरभजन सिंग ( ३२) यांना मागे टाकले. या विक्रमात कपिल देव ४५ विकेट्ससह अव्वल स्थानी आहेत.

4 / 6

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीत मोहम्मद शमी तिसरा आला आहे., कपिल देव यांनी १९८३ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. अजित आगरकरने २००४ मध्ये मेलबर्नवर ४२ धावांत ६ विकेट्स घेतलेल्या.

5 / 6

भारतीय खेळपट्टींवरी २००७ मध्ये वन डेत पाच विकेट्स घेणारा जहीर खान ( वि. श्रीलंका) हा शेवटचा जलदगती गोलंदाज होता. १६ वर्षांनंतर मोहम्मद शमीने हा पराक्रम करून दाखवला.

6 / 6

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांनी सर्वाधिक १७ शतकी भागीदारी केल्या आहेत. भारताने आज इंग्लंडचा ( १६) विक्रम मोडला. शुबमन गिल व ऋतुराज यांनी १४२ धावांची भागीदारी केली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामीझहीर खानकपिल देव