पत्नीकडून धोका, ३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; त्यानंतर भारतीय खेळाडूचे दमदार पुनरागमन

क्रिकेट विश्वातील शमीचा प्रवास हा खूपच खडतर व संघर्षपूर्ण आहे.

जगातील मोठमोठ्या बॅटसमनची आपल्या रिव्हर्स स्विंग बॉलिंगने बोलती बंद करणारा बॉलर म्हणून भारताचा मोहम्मद शमी ओळखला जातो. आज एक उत्कृष्ट बॉलर म्हणून शमीची जगभर ओळख आहे.

क्रिकेट विश्वातील शमीचा प्रवास हा खूपच खडतर व संघर्षपूर्ण आहे. त्याला क्रिकेट यूपीकडून खेळायचं होतं, पण त्याची क्षमता असून अंतर्गत राजकारणामुळे त्याला यूपीच्या अंडर-१९ संघात संधी मिळाली नाही. त्यामुळे तो बंगालला गेला, आणि तेथील मोहन बागान या क्लबकडून खेळू लागला.

मोहम्मद शमीने वयाच्या १७व्या वर्षी यूपीच्या अंडर-१९ संघासाठी चाचणी दिली, परंतु त्याची निवड झाली नाही. यामुळे शमीला मोठा धक्का बसला. दरम्यान, शमीचे प्रशिक्षक बद्रुद्दीन यांना कोलकाताहून त्याच्या मित्राचा फोन आला, जो वेगवान गोलंदाजाच्या शोधात होता. बंगालमध्ये पोहोचताच शमीचे नशीब पालटले.

२०१५ च्या विश्वचषकात दुखापत झाल्यानंतर शमीला पुनरागमन करण्यासाठी सुमारे १८ महिने लागले. त्यानंतर त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आलं. पत्नी हसीन जहाँने शमीवर विवाहबाह्य संबंधांसारखे अनेक गंभीर आरोप केले होते. प्रकरण न्यायालयात गेलं. मात्र, या वेळी शमीला कुटुंब आणि टीम इंडियाचा पूर्ण पाठिंबा मिळाला आणि याच कारणामुळे तो पुन्हा मैदानात परतला.

शमीने रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे मोठा खुलासा केला होता. आतापर्यंत मी ३ वेळा आत्महत्येचा विचार केला होता. कुटुंबातील एकजण नेहमी माझ्या आसपास असायचा, व मी अपार्टमेंटमधील आमच्या २४ व्या मजल्यावरून खाली उडी मारणार नाही, याची काळजी घ्यायचा, असा धक्कादायक खुलासा शमीने केला होता.

शमी म्हणाला की, माझं कुटुंब माझ्याबद्दल खूपच काळजी करत होतं. मला त्यावेळी क्रिकेटचा विचारही करता आला नाही. माझे कुटुंब त्याच्याबरोबर एका खडकासारखे उभं आहे आणि म्हणूनच मी पुन्हा आपल्या पायावर उभा राहू शकला. माझ्या कुटुंबाने मला साथ दिली, माझ्या भावाने मला मदत केली, माझे दोन-तीन मित्र २४ तास माझ्याबरोबर राहत होते. या सर्वांनी मिळून मला क्रिकेटमध्ये परत येण्यास मदत केली, असं शमीने सांगितले.

पत्नी हसीन जहाँने शमीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसह अनेक गंभीर आरोप केले होते. प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, यावेळी शमीला कुटुंब आणि टीम इंडियाचा पूर्ण पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले.

शमीवर पत्नी हसीन जहांने हुंड्यासाठी मारहाण, मारहाण, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप लावले होते. तिने आपल्या फेसबूक अकाउंटवर अनेक फोटोज शेअर करत शमीवर अनेक महिलांसोबत संबंध असल्याचाही आरोप लावला होता. तिने शमी आणि महिलांसोबत झालेल्या चॅटींगचे स्क्रीन शॉटही शेअर केले होते. पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरोधात अटक वॉरंटदेखील जारी केला होता. परंतू, नंतर यांना रद्द करण्यात आले. बीसीसीआयनेही चौकशीनंतर शमीला क्लीन चीट दिली होती.