भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीनं वन डे क्रिकेटमध्ये 2019 या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला.
कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक विकेट घेणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीनं दोनवेळा हा विक्रम नावावर केला असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
कपिल देव यांनी 1986मध्ये सर्वप्रथम कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला होता. कपिल देव यांनी तेव्हा 32 विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर भारतीय गोलंदाजाला हा मान मिळवण्यासाठी 1998साल उजाडलं. तेव्हा अजित आगरकरनं 58 विकेट्स घेत हा विक्रम नावावर केला होता.
इरफान पठाणनं 2004मध्ये 47 विकेट्स घेतल्या होत्या.
2014मध्ये मोहम्मद शमीनं 38 विकेट्स घेत प्रथमच हा मान पटकावला होता.
यंदा मोहम्मद शमीनं 42 विकेट्स घेत हा मान पटकावला.