Join us  

MI vs RR Latest News : बेन स्टोक्सनं रचला इतिहास, धावांचा पाठलाग करताना 'हा' विक्रम करणारा पहिलाच फलंदाज

By स्वदेश घाणेकर | Published: October 26, 2020 7:30 AM

Open in App
1 / 14

MI vs RR Latest News : १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ बलाढ्य मुंबई इंडियन्ससमोर ( Mumbai Indians) गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून RRला विजय मिळवून दिला.

2 / 14

आतापर्यंत MIचे गोलंदाज हे यंदाच्या Indian Premier League ( IPL 2020) सर्वात तगडे मानले जात होते, परंतु आज त्यांना RRच्या या दोन फलंदाजांनी जमिनीवर आणले. राजस्थान रॉयल्सनं हा सामना ८ विकेट राखून जिंकला. बेन स्टोक्सनं शतकी खेळी केली.

3 / 14

फॉर्मात असलेला क्विंटन डी'कॉक ( ६) पहिल्याच षटकात माघारी परतला. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांची ८३ धावांची भागीदारी कार्तिक त्यागीनं संपुष्टात आणली. इशान किशन ३७ धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या व सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली.

4 / 14

कार्तिक त्यागीनं टाकलेल्या २०व्या षटकात हार्दिकनं २७ धावा कुटल्या. हार्दिक २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६० धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सनं ५ बाद १९५ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. यंदाच्या मोसमातील हे तिसरे जलद अर्धशतक आहे.

5 / 14

प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पा ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( ११)चा जेम्स पॅटिन्सननं त्रिफळा उडवला.

6 / 14

बेन स्टोक्सनं एका बाजूनं फटकेबाजी करताना राजस्थानच्या आशा कायम राखल्या होत्या. स्टोक्सनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसननं त्याला तोलामोलाची साथ दिली. दोघांनी ६३ चेंडूंत शतकी भागीदारी करताना धावा व चेंडू यांतील अंतर कमी केलं.

7 / 14

या दोघांसमोर मुंबई इंडियन्सचे गोलंदाज अपयशी ठरताना दिसत होते. संजू सॅमसननं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. स्टोक्स-सॅमसननं नाबाद १५२ धावांची भागीदारी करून राजस्थानला १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळवून दिला.

8 / 14

स्टोक्सन ६० चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०७ धावांवर, तर सॅमसन ३१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला.

9 / 14

आयपीएलच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना १७ खेळाडूंनी शतकी खेळी केली, परंतु एकापेक्षा अधिक शतक कोणाला झळकावता आले नाही.

10 / 14

धावांचा पाठलाग करताना दोन शतक झळकावणारा बेन स्टोक्स हा आयपीएल इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. त्यानं २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करताना गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद १०३ धावा ( ६३ चेंडू, ७ चौकार व ६ षटकार) केल्या होत्या.

11 / 14

12 / 14

13 / 14

14 / 14

टॅग्स :IPL 2020बेन स्टोक्सराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्स