क्रिकेटपटूंसोबतच त्यांच्या जवळच्या व्यक्तींचीही सोशल मीडियावर चर्चा रंगते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याच्या गर्लफ्रेंडनं शनिवारी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला अन् नेटिझन्सनी गुगल सर्च सुरू केलं.
रिषभ पंतनं त्याच्या इस्टाग्रामवर इशा नेगीसह फोटो पोस्ट केला होता आणि त्यानंतर इशाचेही इस्टा फॉलोअर्स झपाट्याने वाढले. १६ जानेवारी २०१९ मध्ये रिषभनं इशासोबतचा फोटो पोस्ट केला. त्यावर त्यानं लिहिलं की,''मला तुला आनंदी ठेवायचे आहे, कारण माझ्या आनंदामागचं कारण तू आहेस.''
इशानं दिल्लीच्या अमेटी युनिव्हर्सिटीतून इंग्लिश ऑनर्समध्ये BA केले आहे.
इशा ही डेहरादून येथी राहणारी आहे आणि तेथील कॉन्व्हेंट जीजस अँड मेरी स्कूलमध्ये तिनं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती दिल्लीला आली.
ती एका इंटिरियर डेकोर डिझायनिंग कंपनीची मालकीण आहे.