Join us

पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू, टाईम स्क्वेअरवर फिल्मी स्टाईल प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 18:04 IST

Open in App
1 / 6

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुलने गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न केले. तो सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी नागपूर येथे आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा आणखी एक सलामीवीर आणि लोकेश राहुलचा मित्रही पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या प्रेमात पडला होता आणि पठ्ठ्याने टाईम स्क्वेअरवर फिल्मी स्टाईल प्रपोजही केलं होतं.

2 / 6

लोकेश राहुलचा मित्र मयांक अग्रवाल याच्या लव्ह स्टोरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मयांक अग्रवालने कालच रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत कर्नाटक आणि सौराष्ट्र आमनेसामने आहेत. कर्नाटकचा कर्णधार मयांक अग्रवालने पहिल्या डावात २४९ धावांची मोठी खेळी केली. त्यामुळे संघाला ४०० हून अधिक धावा करता आल्या.

3 / 6

मयांक अग्रवालचे वैयक्तिक आयुष्य फार इंटरस्टींग आहे. त्याने २०१८ मध्ये वकील अशिता सूद हिच्याशी लग्न केले. दोघेही शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत आणि ७ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच मयांक पिता झाला.

4 / 6

मयांक अग्रवालचे सासरे प्रवीण सूद हे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस आयुक्तांव्यतिरिक्त त्यांनी डीजीपी पदही भूषवले आहे.

5 / 6

मयांकने आशिताला खास पद्धतीने प्रपोज केले. लंडनमधील थेम्स नदीच्या काठावर बांधलेल्या लंडन आयवर त्यांनी आशितासमोर प्रेम व्यक्त केले होते. मयांकच्या प्रपोजलवर आशिताचा विश्वास बसेना.

6 / 6

मयांक अग्रवाल आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार होता. सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल २०२३ साठी आपल्या ताफ्यात ८.२५ कोटींत घेतले.

टॅग्स :मयांक अग्रवाललोकेश राहुल
Open in App