Join us  

भारतीय क्रिकेटपटू अन् क्रीडा मंत्री! पत्नीसोबत रोमँटिक मूड, सुंदरता अशी की ऐश्वर्या-माधुरी फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 2:47 PM

Open in App
1 / 9

मनोज तिवारीची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित सारख्या नायिकांना टक्कर देते. सुष्मिता रॉय तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते आणि ते चाहत्यांना खूप आवडतात. बंगालचा कर्णधार मनोज तिवारीचे रणजी चॅम्पियन होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कालच सौराष्ट्रने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये बंगालचा ९ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले आहे.

2 / 9

बंगाल संघाने १९८९-९० मध्ये इडन गार्डन्सवर दिल्लीचा पराभव करून शेवटचे रणजी विजेतेपद जिंकले होते. ३७ वर्षीय मनोज तिवारी हा केवळ बंगाल संघाचा कर्णधार नाही, तर तो राज्याचा क्रीडा मंत्री देखील आहेत. मनोज तिवारीने 2021 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

3 / 9

राजकारणात पाऊल ठेवल्यानंतरही मनोज तिवारीने आपले पहिले प्रेम क्रिकेट सोडलेले नाही. गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये मैदानावर 'लव्ह लेटर' फिरवल्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मनोज तिवारीने 2022 च्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावले. त्यानंतर त्यान मैदानावरच खिशातून एक कागद काढला आणि हवेत फिरवला. त्यावर त्यांनी पत्नी सुष्मिता रॉयसाठी, आय लव्ह यू सुष्मिता असे लिहीले होते.

4 / 9

5 / 9

मनोज तिवारी आणि सुष्मिता रॉय यांची 2007 मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे भेट झाली. सुंदर बंगाली मुलीला पाहून क्रिकेटर पहिल्याच नजरेत प्रेमात पडला. त्यांनी सर्वप्रथम सुष्मिताकडे मैत्रीचा हात पुढे केला. सुष्मितानेही मनोजशी मैत्री केली. काही भेटीनंतर मनोज तिवारीने सुष्मिताकडे प्रेम व्यक्त केले आणि दोघांनी डेटिंग सुरू केली.

6 / 9

दोघेही जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट करत होते. बराच काळ डेट केल्यानंतर मनोज तिवारीने 2013 मध्ये हावडा येथे सुष्मिताशी लग्न केले. मनोज तिवारी आणि सुष्मिता रॉय यांचा विवाह यूपीच्या पारंपारिक ब्राह्मण कुटुंबातील रितीरिवाजांनुसार तसेच बंगाली पद्धतीने झाला होता.

7 / 9

दोघेही लग्नानंतर आनंदी जीवन जगत आहेत आणि अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असतात. मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. सौंदर्याच्या बाबतीत सुष्मिताने बॉलिवूडच्या बड्या नायिकांना मागे टाकले आहे.

8 / 9

सुष्मिता रॉय ही पती मनोज तिवारी याच्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगी पाठीशी उभी राहिली आहे. एका चाहत्याने इंस्टाग्रामवर ऑल टाइम फ्लॉप आयपीएल इलेव्हन शेअर केला. यामध्ये मनोज तिवारीच्या नावाचा समावेश होता. यामुळे सुष्मिता चांगलीच संतापली आणि तिने या युजरला खडसावले.

9 / 9

मनोज तिवारीने 2004 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिवारीने 2008 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते, परंतु त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फारशी पुढे गेली नाही. तिवारीने भारतासाठी 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनोज तिवारीही आयपीएलमध्ये खेळला आहे, पण दुखापती आणि फॉर्ममुळे तो जास्त खेळू शकला नाही. तिवारीने 2008 ते 2018 पर्यंत IPL मध्ये एकूण 98 सामने खेळले आहेत.

टॅग्स :रणजी करंडकपश्चिम बंगालभारतीय क्रिकेट संघ
Open in App