सौदीतील मॉडेलच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू; वयात १० वर्षांचं अंतर, तरीही...

भारतात क्रिकेट अन् ग्लॅमर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कुणीही सांगू शकतो.. .नुकतेच भारताचा सलामीवीर लोकेश राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. विराट-अनुष्का, हरभजन- गीता, युवराज-हेझल अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. पण, भारताचा एक क्रिकेटपटू थेट सौदी अरेबियातील मॉडेलच्या प्रेमात पडला अन्...

सफाने तिचे शालेय शिक्षण जेद्दाहमधील इंटरनॅशनल इंडियन स्कूलमधून केले. सफाने लहानपणी एकटे राहणे पसंत केले, ती लोकांमध्ये सहज मिसळत नसे. शाळा पूर्ण केल्यानंतर सफा बेगला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. रूढिवादी मुस्लिम कुटुंबात वाढलेले असूनही, सफा बेगच्या पालकांनी त्यांच्या मुलीला तिचे करिअर निवडण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला.

२८ फेब्रुवारी १९९४ रोजी जन्मलेली सफा बेग ही सौदी अरेबियातील जेद्दाह येथील अजीजाच्या श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे. सफाचे वडील सौदीतील एक प्रख्यात व्यापारी आहेत, त्यामुळे सफा आणि तिच्या तीन बहिणी भव्य जीवनशैली जगत होत्या.

सफाने तिचे शालेय शिक्षण जेद्दाहमधील इंटरनॅशनल इंडियन स्कूलमधून केले. सफाने लहानपणी एकटे राहणे पसंत केले, ती लोकांमध्ये सहज मिसळत नसे. शाळा पूर्ण केल्यानंतर सफा बेगला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. रूढिवादी मुस्लिम कुटुंबात वाढलेले असूनही, सफा बेगच्या पालकांनी त्यांच्या मुलीला तिचे करिअर निवडण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला.

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सफा ही आखाती देशातील सर्वात लोकप्रिय मॉडेल बनली. तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीव्यतिरिक्त, सफाला नेल आर्टमध्ये देखील खूप रस आहे आणि ती खूप चांगली आहे. तिची नेल आर्ट तुम्ही अनेकदा तिच्या चित्रांमध्ये पाहू शकता. मॉडेलिंगसोबतच सफाने एका पीआर कंपनीतही काम केले आहे.

सफा बेग ही भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याची पत्नी आहे. इरफान अन् सफा यांच्यात १० वर्षांचे अंतर आहे. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या क्रिकेट रेकॉर्डबद्दल जवळपास प्रत्येक चाहत्यांना माहिती आहे, पण त्याच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

सौदी अरेबियातील एका मॉडेलला पाहून प्रेमात पडला. इरफान पठाण आणि सफा बेगची पहिली भेट २०१४ मध्ये झाली होती. इरफान पठाण त्याच्या एका क्रिकेट दौऱ्यावर होता आणि एका सामाजिक मेळाव्यात सफा आणि भारतीय अष्टपैलू खेळाडू समोरासमोर आले. सफाला पाहताच इरफान पठाण पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला.

सफा बेग ही इरफान पठाणपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. असे असूनही दोघांमध्ये एक सुंदर नाते निर्माण होऊ लागले. सुमारे दोन वर्षांत सफा आणि इरफान एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागले. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर इरफान पठाणने आपल्या प्रेम सफाला वडोदरा येथे बोलावले आणि तिची कुटुंबाशी ओळख करून दिली.

सफाने तिच्या संस्कार, नम्रता आणि वागण्याने पहिल्याच भेटीत इरफानच्या कुटुंबाची मने जिंकली. यानंतर इरफान पठाण आणि सफा बेगच्या कुटुंबीयांनी भेटून त्यांच्या लग्नाची पुष्टी केली. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी एका छोट्याशा लग्नसोहळ्यात इरफान पठाण आणि सफा बेग एकमेकांचे कायमचे बनले.

इरफान पठाण आणि सफा बेगचे लग्न मक्का येथे झाले होते आणि फक्त जवळच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. निकाहनंतर इरफान पठाणच्या लग्नाचे रिसेप्शन वडोदरा येथे पार पडले, ज्यामध्ये अनेक क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली.

लग्नानंतर २० डिसेंबर २०१६ रोजी इरफान आणि सफा यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. डिसेंबर २०२१ मध्ये इरफान आणि सफा पुन्हा एकदा एका मुलाचे पालक झाले.