Join us

Birthday Special: रोहित शर्माची हिट लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 14:11 IST

Open in App
1 / 7

भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू असलेल्या रोहित शर्माचा आज 32 वा वाढदिवस आहे. क्रिकेटचं मैदान गाजवणारा रोहित शर्मा वैयक्तिक आयुष्यात स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजरच्या प्रेमात क्लिन बोल्ड झाला.

2 / 7

प्रेमाची इनिंग सुरू होण्याच्या 6 वर्ष आधीपासून रोहित आणि रितिका सजदेह एकमेकांना ओळखायचे. रोहितच्या क्रिकेटशी संबंधित सर्व गोष्टींच्या व्यवस्थापनाचं काम रितिका पाहायची.

3 / 7

रितिका भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला राखी बांधते, हे फार कमी जणांना माहीत आहे. रोहित आणि रितिका सुरुवातीला कामासाठी भेटायचे. त्यानंतर त्यांची मैत्री झाली.

4 / 7

मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांही हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

5 / 7

सहा वर्षांपासून उत्तम मैत्रीण असलेल्या रितिकाला प्रपोज करण्यासाठी रोहितनं स्पेशल जागेची निवड केली. मुंबईतल्या बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रोहितनं गुडघ्यावर बसून रितिकाला प्रपोज केलं.

6 / 7

रोहितनं दिलेल्या या सरप्राईजमुळे रितिकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. वयाच्या 11 व्या वर्षी रोहितनं बोरिवली स्पोर्ट्स क्लबमधून क्रिकेट करिअरची सुरुवात केली. त्यामुळेच रितिकाला प्रपोज करण्यासाठी त्यानं जाणीवपूर्वक याच ठिकाणाची निवड केली.

7 / 7

3 जून 2015 रोजी रोहित आणि रितिकाचा साखरपुडा झाला. 13 डिसेंबर 2015 रोजी ही जोडी विवाह बंधनात अडकली. या सोहळ्याला क्रिकेट विश्वातले अनेक दिग्गज, उद्योग, बॉलिवूडमधली बडी मंडळी उपस्थित होती.

टॅग्स :रोहित शर्मा