Join us

'यूनिवर्स बॉस' असलेल्या ख्रिस गेलचा शाही थाट पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 16:08 IST

Open in App
1 / 9

गेल हा स्वच्छंदी माणूस आहे. कोणत्या एका गोष्टीमध्ये तो रमत नाही. तसेच फक्त एका रंगामध्ये राहणं, त्याला आवडत नाही. त्यामुळे आपल्या पेहरावामध्ये तो बरेच रंग असतील, याची दक्षता घेतो. त्यामुळेच गेलचा लूक हा स्पेशल ठरतो.

2 / 9

गेलला सर्वच रंग आवडत असले तरी त्याचा आवडता रंग कोणता, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे निळा. कारण गेल हा निळ्या रंगाचा पेहराव तर करतोच पण त्याचा गॉगलही निळ्याच रंगाचा आहे.

3 / 9

गेलला महागड्या गाड्या चालवण्याचाही छंद आहे. गेलकडे पिवळ्या रंगाची फेरारी ही गाडी आहे. गेलला ही गाडी चालवायला भरपूर आवडते.

4 / 9

सेंट किट्समध्ये अर्ल्टा कार्निव्हल होते. या कार्निव्हलला गेल आवर्जुन हजेरी लावतो. या कार्निव्हलमध्ये पारंपरिक वस्त्र परीधान करायची असतात. गेल या कार्निव्हलला पत्नी आणि मुलीसहीत हजेरी लावतो. पारंपरिक वेशभूषेमध्ये गेलचा लूक वेगळाच दिसतो.

5 / 9

गेल हा पार्टी मॅन असल्याचे बोलले जाते. गेलच्या पार्ट्यांमधल्या बऱ्याच गोष्टी चवीने चघळल्या जातात. पण गेलला सर्वात जास्त आवडलेली पार्टी होती ती धावांचा अनभिषीक्त सम्राट असलेल्या उसेन बोल्टबरोबरी. बोल्ट हा जमैकाचा आहे. आणि त्याने जरभरात आपली दहशत बसवली आहे. अगदी तशीच गोष्ट गेलचीही आहे. त्यामुळे जेव्हा दोन सम्राट एकमेकांना भेटतात तेव्हा ती एक ग्रेट भेट ठरते.

6 / 9

मैदानात मोठे फटके मारायचे म्हणजे त्यासाठी व्यायामही गरजेचा. गेल कधीही आपल्या व्यायाम चुकवत नाही.

7 / 9

ताकदीने फटके मारण्यासाठी आहारही चांगला असायला हवा. गेल आपल्या आहारावर नेहमीच भर देतो.

8 / 9

गेलला जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा तो पार्टी करतो किंवा पार्ट्यांना जाणे पसंत करतो. गेल आपल्याबरोबर पत्नीलाही घेऊन जायला विसरत नाही.

9 / 9

गेल हा आक्रमक फलंदाज असला तरी तो एक माणूस म्हणून हळवा आहे. त्यामुळे सुट्टी असताना तो आपला वेळ मुलगी प्रिंसेस क्रिश-एलियानाबरोबर व्यतित करतो.

टॅग्स :ख्रिस गेलवेस्ट इंडिज