Join us

सचिन तेंडुलकरबाबत पोस्ट केला चुकीचा व्हिडीओ; अमिताभ बच्चन यांनी डिलीट केलं ट्विट, मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 20:45 IST

Open in App
1 / 7

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्यासंदर्भात चुकीचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन ( Amithabh Bachchan) यांना माफी मागावी लागली. अमिताभ यांनी ते ट्विट व व्हिडीओही डिलीट केला आहे. त्यानंतर त्यांनी Legends Cricket Leagueचा नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

2 / 7

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी शनिवारी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. त्यात त्यांनी Legends Cricket Leagueमध्ये सचिन तेंडुलकर खेळणार असल्याचा उल्लेख केला होता. पण, सचिन तेंडुलकरच्या व्यवस्थापनानं यावर स्पष्टिकरण देताना तेंडुलकर Legends Cricket Leagueमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर अमिताभ यांनी तो व्हिडीओ डिलीट करून माफी मागितली.

3 / 7

सचिन तेंडुलकरची व्यवस्थापन कंपनी SRT Sports Manegment Pvt Ltd यांनी स्पष्ट केले की, महान फलंदाज आगामी Legends Cricket Leagueमध्ये खेळणार नाही. आयोजक चाहत्यांची व अमिताभ बच्चन यांची दिशाभूल करत आहेत.

4 / 7

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सुधारित व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर लिहिलं की Legends Cricket Leagueचा हा फायनल प्रोमो आहे. माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर माफी मागतो.

5 / 7

Legends Cricket Leagueमध्ये भारत, श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांचे माजी खेळाडू खेळणार आहेत. २० जानेवारीपासून ओमान येथील अल अमेरट क्रिकेट स्टेडियमवर ही लीग खेळवण्यात येणार आहे. इंडियन महाराजा या संघासह आशिया आणि रेस्ट ऑफ दी वर्ल्ड असे दोन संघाचाही लीगमध्ये सहभाग असणार आहे.

6 / 7

इंडियन महाराजा संघाकडून युवराज सिंग, मोहम्मद कैफ, स्टुअर्ट बिन्नी, वीरेंद्र सेहवाग, हरभजन, इरफान, युसूफ, एस बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाळ राव, मुनाफ पटेल, संजय बांगल, नयन मोंगिया आणि अमित भंडारी हेही या लीगमध्ये खेळणार आहेत.

7 / 7

आशिया लायन्स संघाकडून शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, रोमेश कालुवितरणा, तिलकरत्ने दिलशान, अझर महमुद, उपुल तरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल आणि अस्गर अफगान हे खेळताना दिसतील.

टॅग्स :सचिन तेंडुलकरअमिताभ बच्चन
Open in App