Join us  

जाणून घ्या, IPL च्या सर्व १० टीमचे मालक कोण आणि किती आहेत श्रीमंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:36 AM

Open in App
1 / 11

इंडियन प्रीमियर लीग (IPL) देशातील क्रिकेट चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम म्हणजे ही जगातील दुसरी सर्वात मौल्यवान क्रीडा लीग आहे. IPL ची ब्रँड व्हॅल्यू $8.4 अब्ज डॉलर झाली आहे. पहिल्या स्थानावर नॅशनल फुटबॉल लीग (NFL) आहे, ज्याची ब्रँड मूल्य २०२३ मध्ये $10.8 अब्ज डॉलर आहे. २००८ मध्ये सुरू झालेली IPL लोकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे तर त्याचसोबत सहभागी संघांच्या मालकांची कमाई देखील वाढवत आहे.

2 / 11

मुंबई इंडियन्स - आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू ९९६२ कोटी रुपये आहे आणि ती या बाबतीत अव्वल आहे. दुसरीकडे, जर आपण रिलायन्सबद्दल बोललो तर ती देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असून तिचे बाजार भांडवल रु. १७.०५ लाख कोटी आहे.

3 / 11

चेन्नई सुपर किंग्ज - इंडिया सिमेंट्सच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स, यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, जी आयपीएल २०२३ ची विजेता बनली आहे आणि पाच वेळा चॅम्पियन आहे. चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड व्हॅल्यू ८८११ कोटी रुपये आहे. त्याचे मालक २००८ पासून इंडिया सिमेंट्स एन श्रीनिवासन आहेत.

4 / 11

कोलकाता नाईट रायडर्स - कोलकाता नाइट रायडर्सची(KKR) ब्रँड व्हॅल्यू ८४२८ कोटी रुपये आहे. त्याची मालकी रेड चिली एंटरटेनमेंटकडे आहे. यामध्ये चित्रपट अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता यांचा पैसा गुंतला आहे.

5 / 11

सनराइज हैदराबाद - सनरायझर्स हैदराबादची ब्रँड व्हॅल्यू ७४३२ कोटी रुपये आहे. या आयपीएल टीमचे मालक सन टीव्ही नेटवर्क आहेत आणि CEO काव्या मारन आहेत, जी सन ग्रुपच्या संस्थापक कलानिथी मारन यांची मुलगी आहे.

6 / 11

दिल्ली कॅपिटल्स - दिल्ली कॅपिटल्सची ब्रँड व्हॅल्यू ७९३० कोटी रुपये आहे. त्याची मालकी GMR ग्रुप आणि JSW ग्रुपकडे एकत्रितपणे आहे. पार्थ जिंदाल हे दिल्ली कॅपिटलचे चेअरमन आहेत.

7 / 11

राजस्थान रॉयल्स - राजस्थान रॉयल्सची ब्रँड व्हॅल्यू ७६६२ कोटी रुपये आहे. या आयपीएल संघाची मालकी रॉयल मल्टीस्पोर्ट प्रा. लि. कडे आहे. या टीमचे मालक मनोज बडाले आणि लचलान मर्डोक हे आहेत.

8 / 11

पंजाब किंग्ज - आयपीएल टीम पंजाब किंग्सची ब्रँड व्हॅल्यू ७०८७ कोटी रुपये आहे. त्याच्या मालकांमध्ये मोहित बर्मन, नेस वाडिया, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि करण पाल यांचा समावेश आहे.

9 / 11

लखनौ सुपर जायंट्स - लखनऊ सुपर जायंट्सची ब्रँड व्हॅल्यू ८२३६ कोटी रुपये आहे. या संघाची मालकी RPSG व्हेंचर्स लिमिटेड, उद्योगपती संजीव गोयंका यांच्या नेतृत्वाखालील कंपनी असून ते RPSG समूहाचे मालक आहेत.

10 / 11

गुजरात टायटन्स - गुजरात टायटन्सची ब्रँड व्हॅल्यू ६५१२ कोटी रुपये आहे. या संघाचे नेतृत्व CVC Capitals करत आहे. त्याचे मालक स्टीव्ह कोल्टेस(Steve Koltes) आणि डोनाल्ड मॅकेन्झी(Donald Mackenzie) आहेत.

11 / 11

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची ब्रँड व्हॅल्यू ७८५३ कोटी रुपये आहे. त्याच्या मालकांबद्दल बोलायचे तर, ते युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या(United Spirits Limited) मालकीचे आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App