इंडियन प्रीमियर लीगच्या १९ वर्षांच्या इतिहासात नव्या विक्रमासह जुने विक्रम मोडताना पाहायला मिळाला आहे. पण केएल राहुलनं एक असा अविश्वसनीय विक्रम नोंदवला आहे जो ना आतापर्यंत कुणाला जमला आहे ना यापुढे कोणी अशी कामगिरी करु शकेल.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर लोकेश राहुलनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात १४ चेंडूत २३ धावा केल्या. या छोट्याखानी खेळीसह दिल्लीच्या संघाकडून १००० धावांचा पल्ला गाठताच केएल राहुलनं IPL मध्ये खास विक्रमाला गवसणी घातली.
IPL च्या इतिहासात तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून १००० पेक्षा अधिक धावा करणारा केएल राहुल हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचा हा रेकॉर्ड मोडणं अशक्यच वाटते.
आयपीएलमध्ये केएल राहुल ५ वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसला आहे. यात पंजाब किंग्स, लखनौ सुपर जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून त्याने सर्वाधिक सामने खेळले आहेत.
लोकेश राहुलनं पंजाब किंग्सकडून ५५ सामन्यात ५६.६२ च्या सरासरीसह एकूण २५४८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाकडून ३८ सामन्यात त्याने ४१.४७ च्या सरासरीसह एकूण १४१० धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आतापर्यंत २४ सामन्यात लोकेश राहुलनं ५० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह १००७ धावा केल्या आहेत. या फ्रँचायझी संघाकडून सर्वात जलद १००० धावांचा पल्ला गाठला आहे. याआधी रिषभ पंत आणि जेपी ड्युमिनी यांनी ३५ डावात हा पल्ला गाठला होता.
केकेआर विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल याने आयपीएल कारकिर्दीत ५०० चौकार मारणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीतही एन्ट्री मारली. अशी कामगिरी करणारा तो ७ वा फलंदाज ठरला.