SAT20 League : Mumbai Indiansच्या 'स्टार'साठी Kavya Maranने पाण्यासारखा पैसा ओतला, लीगमध्ये महागडा खेळाडू ठरला

SAT20 Full Squads: दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेली ट्वेंटी-२० लीग चर्चेत आली ती मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आदी IPL फ्रँचायझीने केलेल्या गुंतवणूकीमुळे. त्यामुळेच SAT20 Leagueच्या लिलावावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या आणि ऑक्शनच्या वेळी सर्वांच्या चर्चेची विषय राहिली ती SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran)...

SAT20 Full Squads: दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेली ट्वेंटी-२० लीग चर्चेत आली ती मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आदी IPL फ्रँचायझीने केलेल्या गुंतवणूकीमुळे. त्यामुळेच SAT20 Leagueच्या लिलावावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या आणि ऑक्शनच्या वेळी सर्वांच्या चर्चेची विषय राहिली ती SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran)... तिच्या सुंदरतेमुळे ती चर्चेत असतेच पण, यावेळी तिने Mumbai Indians च्या 'स्टार' युवा खेळाडूसाठी फ्रँचायझीच्या खात्यातील जवळपास २६ टक्के रक्कम खर्ची घातली. SAT20 League Auction मधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरलाय... SA T20 Costliest Players LIST

डर्बन्स सुपर जायंट्स ( Durban’s Super Giants Squad) -हेनरिच क्लासेन, जॉहन्सन चार्ल्स, मॅथ्या ब्रित्झके, क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रेटोरियस, केशव महाराज, किमो पॉल, वियान मल्डर, ख्रिस्टीयन जाँकर, जेसन होल्डर ( वेस्ट इंडिज), कायले मेयर्स ( वेस्ट इंडिज), कायले अबॉट, सिमोन हार्मर, ज्युनियर डाला, दिलशान मधुशंका ( श्रीलंका), रिसे टॉप्ली ( इंग्लंड), पेनेलन सुब्रायन

जोहान्सबर्ग सुपर किंग्स ( Joburg Super Kings Squad) - फॅफ ड्यू प्लेसिस, डोनाव्होन फेरेरा, यानेमन मलान, रिझा हेंड्रीक्स, हॅरी ब्रूक ( इंग्लंड), कायले वेरेयने, लेयूस ड्यु प्लूय, जॉर्ज गार्टन ( इंग्लंड), लुईस ग्रेगोरी ( इंग्लंड, रोमारिया शेफर्ड ( वेस्ट इंडिज), अल्झारी जोसेफ ( वेस्ट इंडिज), लिझाड विलियम्स, कॅबेल सेलेका, नंद्रे बर्गर, मलुसी सोबोतो, महिश थिक्षाना ( श्रीलंका), गेरलँड कोएत्झी

मुंबई इंडियन्स केप टाऊन ( MI Cape Town Squad) - रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रियान रिकल्टन, ग्रांट रोएलोफ्सेन, वेबली मार्शल, ओडीन स्मिथ ( वेस्ट इंडिज), जॉर्ज लिंडे, ड्युआन येनसन, डेलानो पोत्गिटर, राशिद खान ( अफगाणिस्तान), लिएम लिव्हिंगस्टोन ( इंग्लंड), सॅम कुरन ( इंग्लंड), बेयूरान हेंड्रीक्स, ओली स्टोन ( इंग्लंड), वकार सलामखेइल ( अफगाणिस्तान), जियाद अब्राहम्स, कागिसो रबाडा

पर्ल रॉयल्स ( Paarl Royals Squad ) - जेसन रॉय ( इंग्लंड), इयॉन मॉर्गन ( इंग्लंड), डेन विलास, मिचेल व्हॅन बूरेन, विहान ल्युब्बे, जोस बटलर ( इंग्लंड), डेव्हिड मिलर, फेरीस्को अॅडम्स, इम्रान मनाक, कोडी युसूफ, एव्हन जोन्स, तब्रेझ शम्सी, लुंगी एनगिडी, बी जॉर्न फॉर्च्युन, रेमन सिमंड्स ( वेस्ट इंडिज), ओबेड मॅकॉय ( वेस्ट इंडिज) कॉर्बिन बॉश

सनरायझर्स इस्टर्न केप ( SunRisers Eastern Cape Squad ) - त्रिस्तान स्टुब्स, सॅरेल एर्वी, जॉर्डन कॉक्स ( इंग्लंड), अॅडम रॉसिंग्टन ( इंग्लंड), मार्कस एकर्मन, एडन मार्कराम, मार्को येनसन, सिसांडा मगाला, ब्रेडन कार्स ( इंग्लंड), जेजे स्मट्स, टॉम एबेल ( इंग्लंड), आया जीकमेन, रोऑफ व्ह‌ॅन डेर मर्वे, जेम्स फुलर ( इंग्लंड), मेसन क्रेन ( इंग्लंड), जुनैद दावूद, ओटनेल बार्टमन

प्रेटोरिया कॅपिटल्स ( Pretoria Capitals Squad ) - रिली रोसोवू, फिल सॉल्ट ( इंग्लंड), कुसल मेंडीस ( श्रीलंका), विल जॅक्स ( इंग्लंड), कॅमेरून डेल्पोर्ट, थेयूनिस डी ब्रुयन, मार्को मराईस, जेम्स निशॅम ( न्यूझीलंड), वेन पार्नेल, इथान बॉश, शेन डॅड्सवेल, जोश लिटल ( आयर्लंड), आदिल राशिद ( इंग्लंड), शॉन व्हॉन बर्ग, डॅरीन डुपाव्हिलन, एनरिच नॉर्खिया, मिचेल प्रेटोरियस.

पहिल्या वहिल्या दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगसाठी पार पडलेल्या ऑक्शनमध्ये ३१४ खेळाडूंनी आपले नशीब आजमावले आणि मोजकेच खेळाडू कोट्याधीश झाले. डीन एल्गर, जीमी निशॅम, टेम्बा बवुमा हे अनुभवी खेळाडू अनसोल्ड राहिले. यापैकी काहींना नंतर काही फ्रँचायझीने घेतले. मुंबई इंडिन्स फ्रँचायझीच्या MI Cape Town आणि सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या SunRisers Eastern Cape यांच्यातल्या चुरशीने २२ वर्षीय खेळाडूचे नशीब चमकवले.

२२ वर्षीय त्रिस्तान स्टब्स ( Tristan Stubbs) हा दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. MI Cape Town आणि चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीच्या JoBurg Super Kings यांनी स्टब्ससाठी जोरदार बोली लावली, परंतु ७ मिलियन पर्यंत आकडा गेल्यानंतर सुपर किंग्सने माघार घेतली आणि इस्टर्न केपची एन्ट्री झाली. काव्या मारनने स्तब्ससाठी फ्रँचायझीच्या खात्यातील २६ टक्के रक्कम खर्ची घातली व R ९.२ मिलियन म्हणजेच भारतीय रकमेत ४.१ कोटींत युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले.

दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील महागडे खेळाडू ( SA 20 League Auction: COSTLIEST BUYS) - त्रिस्तान स्टब्स ( ४.१ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप), रिली रोसोवू ( २.७९ कोटी, प्रेटोरिया कॅपिटल्स), मार्को येनसन ( २.७४ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप), वेन पार्नेल ( २.५२ कोटी, प्रेटोरिया कॅपिटल्स), डोनाव्होन फेरेरा ( २.४७ कोटी, जोहान्सबर्ग सुपर किंग्स), सिसांडा मगाला ( २.४३ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप), हेनरिच क्लासेन ( २.०२ कोटी, डर्बन्स सुपर जायंट्स), रिझा हेंड्रीक्स ( २.०२ कोटी, जोहान्सबर्ग सुपर किंग्स), तब्रेझ शम्सी ( १.९३ कोटी, पार्ल रॉयल्स), ड्वेन प्रेटोरियस ( १.९० कोटी, डर्बन्स सुपर जायंट्स)

दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-२० संघातील उगवता तारा असे स्टब्सला म्हटले जाते. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-२० चॅलेंज स्पर्धेत त्याने ७ सामन्यांत २९३ धावा केल्या. आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ताफ्यात घेतले. त्या ने मोजक्याच सामन्यात आपला दम दाखवला नुकतंच त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहाव्या क्रमांकावर येताना २८ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या.