भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही देखील क्रिकेटशी कनेक्ट असलेला लोकप्रिय चेहरा आहे. तिने स्पोर्ट्स अँकरच्या रुपात आपली खास छाप सोडलीये.
IPL असो किंवा आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा मॅच असली की, संजना दिसणार हे जवळपास फिक्स असायचे. पण सध्या बाळाला जन्म दिल्यापासून ती अँकरिंगपासून दूर आहे.
संजना गणेशन सध्या अँकरिंगपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट आहे. सोशल मीडियावरील खास पोस्टनं ती लक्षवेधून घेताना दिसते.
इन्स्टाग्राम अंकाउंटवरील नव्या पोस्टच्या माध्यमातून संजनानं काही खास फोटो शेअर केले आहेत. नव्या वर्षांतील पहिल्या १० दिवसांतील खास क्षण तिने या पोस्टच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
बुमराहसोबत संजना अनेक फोटो शेअर करताना दिसते. पण हा फोटो एकदम खास आहे. कारण या सेल्फीत नवरोबावरील प्रेम दाखवताना ती आपल्या नव्या सनग्लासेसची फ्रेम दाखवताना दिसून येते.
संजनाच्या नव्या पोस्टमध्ये तिच्या बहिणीचीही झलक पाहायला मिळते. यात दोघी आउटिंगचा आनंद घेतानाचा सीन पाहायला मिळतोय.
संजनाच्या इन्स्टा पोस्टच्या स्लाइटमधील एक से बढकर एक फ्रेममधील जसप्रीत बुमराहचा सोलो अंदाजही एकदम झक्कास असाच आहे.
संजनानं हा फोटो शॉपिंगला बाहेर पडल्यावर क्लिक केल्याचे दिसते. स्वत:चा सेल्फी टिपलेला तिचा हा फोटोही एकमद मस्तच आहे. आउटफिटसह ब्लॅक कलमधील मोबाईलसह तिच्या स्टायलिश अंदाजाची झलक यात पाहायला मिळते.
नव्या सनग्लासेसची फ्रेम, जोडीनं काढलेल्या सेल्फीतून नव्या सनग्लासेसची फ्रेम दाखवण्यापासून ते अगदी पार्क डे आणि बीच डेपर्यंतंचे नव्या वर्षांतील पहिल्या १० दिवसाचे खास क्षण असा उल्लेख करत संजनानं हे फोटो शेअर केले आहेत.