Join us

Jasprit Bumrah getting married : जसप्रीत बुमराहची 'लाईफ पार्टनर' कोण?; या अभिनेत्रीचं नाव चर्चेत

By स्वदेश घाणेकर | Updated: March 3, 2021 10:12 IST

Open in App
1 / 14

भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांचं नातं नेहमी चर्चेत राहिलं आहे. अगदी पतौडी यांच्यापासून ते विराट कोहलीपर्यंत क्रिकेट आणि बॉलिवूड हे एकत्र आलेले अनेकदा पाहायला मिळालं आहे.

2 / 14

पण, अनेकदा त्या केवळ वायफळ चर्चाच राहिल्या. आता पुन्हा एकदा एका अभिनेत्रीचं नाव चर्चेत आलं आहे आणि त्याला निमित्त ठरलं आहे ते जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या वृत्ताचं... Jasprit Bumrah getting married

3 / 14

भारत-इंग्लंड ( India vs England ) चौथ्या कसोटीपूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने सुट्टी घेतली. BCCI ने ती मंजूर करताना त्याला रिलीज केलं आणि आता तो चौथ्या कसोटीत खेळणार नाही.

4 / 14

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या टीम इंडियातही त्याचा समावेश नाही आणि तो आता वन डे मालिकेतही खेळणार नाही.

5 / 14

त्याच्या सुट्टी मागण्यामागे दुखापत किंवा कामाचा ताण हे कारण सांगितले जात होते, पण आता खरं कारण समोर आले आहे. जसप्रीत बुमराहने लग्न करण्यासाठी ही सुट्टी घेतली आहे. तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

6 / 14

'लवकरच लग्न करणार असल्याचे त्याने BCCI ला कळवले आहे. या आनंदाच्या प्रसंगाच्या तयारीसाठी त्याने ही सुट्टी घेतली आहे,' असे वृत्त ANI ने सूत्रांचा हवाला देऊन प्रसिद्ध केले आहे.

7 / 14

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं दाक्षिणात्या अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ( Anupama Parameswaran) हिच्याशी आधीही जोडलं गेलं आहे. त्यात त्याच्या लग्नाच्या वृत्तानं बुमराह हिच्याशीच लग्न करेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

8 / 14

सोशल मीडियावर बुमराह आणि अनुपमा एकमेकांच्या पोस्टला लाईक्स करत असतात आणि विशेष म्हणजे बुमराहच्या फ्रेंड लिस्टमध्ये अनुपमा ही एकमेव दक्षिण भारतातील अभिनेत्री आहे.

9 / 14

या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. बुमराहनं या नात्याबद्दल कोणतिही प्रतिक्रीया दिली नसली तरी अनुपमानं आम्ही चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले. त्यापलिकडे आमच्यात असं काही नाही, असंही अनुपमानं सांगितलं होतं.

10 / 14

अनुपमाने नटसर्वभूवमा या कन्नड चित्रपटातून काही महिन्यापूर्वी या क्षेत्रात पदार्पण केले होते. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. सध्या ती एका तेलुगू चित्रपटाची तयारी करत आहे.

11 / 14

याआधी अभिनेत्री राशी खन्ना हिच्यासोबतची बुमराहच्या प्रेमसंबंधाची चर्चा रंगली होती. पण, तिनं या चर्चांवर उत्तर देताना म्हटलेलं की, मला केवळ इतकंच माहितीय की तो एक क्रिकेटपटू आहे. त्याच्यात आणि माझ्यात असे कोणतेही प्रेमसंबंध नाही .

12 / 14

13 / 14

14 / 14

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध इंग्लंडबॉलिवूड