SENA देशांविरुद्ध 'पंजा' मारण्यात बुमराह टॉपला; पाकच्या वसीम अक्रमचा रेकॉर्ड मोडला

इथं एक नजर टाकुयात SENA देशांविरुद्ध सर्वाधिक वेळा ५ विकेट्सचा डाव साधणाऱ्या आघाडीच्या ५ गोलंदाजांवर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहनं पाच विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांविरुद्ध कसोटी सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणाऱ्या आशियाई जलदगती गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.

जसप्रीत बुमराहनं पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वसीम अक्रम याला मागे टाकत आशियातील नंबर वन जलदगती गोलंदाज ठरला आहे. इथं एक नजर टाकुयात या यादीतील आघाडीच्या गोलंदाजांवर

वसीम अक्रमनं आपल्या कसोटी कारकिर्दीत १०४ सामन्यात २५ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. यात १२ वेळा त्याने SENA देशांविरुद्ध पाच विकेट्सचा डाव साधला आहे.

कपिल देव यांनी १२३ कसोटी सामन्यात २३ वेळा पाच विकेट्सचा डाव साधला असून त्यांनी १३ वेळा SENA देशांविरुद्ध पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

पाकिस्तानच्या वकार यूनिस याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ८८ सामन्यात २२ पैकी ९ वेळा SENA देशांविरुद्ध ५ विकेट्स हॉलचा डाव साधला आहे.