Join us

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये करतेय मौजमजा, शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 17:37 IST

Open in App
1 / 8

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलच्या पूर्वतयारीमध्ये गुंतला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल आहे.

2 / 8

दरम्यान, जसप्रीत बुमराह आयपीएलच्या तयारीमध्ये गुंतला असताना त्याची पत्नी संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये मौजमजा करत आहे. तिने न्यूझीलंडमधून काही खास फोटो शेअर केले आहे. त्यात ती धम्माल करताना दिसत आहे. तिने विविध लोकेशन्सवरचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 8

संजना गणेशन एक टीव्ही प्रेझेंटर आहे. तसेच ती यावेळी न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषकाचं कव्हरेज करत आहे. संजना सातत्याने महिला क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेत आहे. तसेच आसीसीसाठी कंटेंट तयार करत आहे.

4 / 8

दरम्यान, या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढत संजना गणेशन फिरूनही घेत आहे. नुकतीच तिने न्यूझीलंडमधील Whangamatā बेटाला भेट दिली

5 / 8

संजना गणेशने सर्फिंगचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, मला माझे खांदे असल्याचे जाणवत नाही आहे. मात्र हा पूर्ण पैसा वसूल अनुभव होता.

6 / 8

हल्लीच संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह यांनी त्यांच्या विवाहाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.  त्यावेळी दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांसाठी खास पोस्ट लिहिली होती.

7 / 8

महिला विश्वचषक संपल्यानंतर संजना गणेशन पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये दाखल होऊ शकते.

8 / 8

मात्र तत्पूर्वी तिला क्वारेंटाईनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर तिला जसप्रीत बुमरासह बायो-बबलमध्ये प्रवेश मिळू शकतो.

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशनआंतरराष्ट्रीय क्रिकेटसेलिब्रिटी
Open in App