Join us  

जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:23 AM

Open in App
1 / 10

इंग्लंड संघानं पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली. तिसऱ्या कसोटीत जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करली. अँडरसननं या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीची विकेट घेत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

2 / 10

कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा तो जगातला पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या फिरकीपटूंनी हा पराक्रम केला आहे.

3 / 10

मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका ) 133 सामने व 800 विकेट्स, शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया) 145 सामने व 708 विकेट्स, अनिल कुंबळे ( भारत) 132 सामने व 619 विकेट्स, जेम्स अँडरसन ( इंग्लंड ) 156 सामने व 600 विकेट्स आणि ग्लेन मॅक्ग्राथ ( ऑस्ट्रेलिया) 124 सामने व 563 विकेट्स हे कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज आहे.

4 / 10

150 कसोटी खेळणाराही जेम्स अँडरसन पहिला जलदगती गोलंदाज आहे. त्यानं 156 कसोटी सामन्यांत 33717 चेंडू टाकले आहेत. त्यानंतर कर्टनी वॉल्श यांचा ( 132 सामने व 30019 चेंडू) क्रमांक येतो.

5 / 10

वयाच्या तीशीनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांत अँडरसनचा दुसरा क्रमांक येतो. त्यानं 85 सामन्यांत 332 विकेट्स घेतल्या आहेत, तर वॉल्श यांनी 81 सामन्यांत 341 विकेट्स नावावर केल्या आहेत.

6 / 10

अँडरसननं सर्वाधिक 9 वेळा चार फलंदाजांना बाद केलं आहे. त्यात सचिन तेंडुलकर, अझर अली, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लार्क यांचा समावेश आहे.

7 / 10

अँडरसनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 32 सामन्यांत 3.05 इकॉनॉमीनं 104 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( 93 विकेट्स), वेस्ट इंडिज ( 87), पाकिस्तान (74) आणि न्यूझीलंड ( 60) यांचा क्रमांक येतो

8 / 10

जेम्स अँडरसनच्या विकेट्सची विभागणी केली, तर त्यानं सर्वाधिक विकेट्स या भारताविरुद्ध घेतल्या आहेत.

9 / 10

भारताविरुद्ध जेम्स अँडरसननं 27 सामन्यांत 2.84 च्या इकॉनॉमीनं 110 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अँडरसनच्या 600 विकेट्सच्या विक्रमात भारतीय फलंदाजांचा मोठा वाटा आहे आणि ही बाब अभिमानास्पद नक्कीच नाही.

10 / 10

टॅग्स :जेम्स अँडरसनइंग्लंडपाकिस्तानभारतसचिन तेंडुलकर