Join us

"विराट कोहलीला लग्नासाठी मागणी घालणंं निव्वळ जोक"; सौंदर्यवतीने का दिली अशी प्रतिक्रिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 20:43 IST

Open in App
1 / 9

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध दमदार शतक ठोकले आणि टीम इंडियाचा सहज विजय मिळवून दिला.

2 / 9

विराट कोहली हा अप्रतिम फलंदाज आहेच, पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे हे शतक सर्वार्थाने खूपच खास ठरले.

3 / 9

विराटच्या खेळावर केवळ तरुणच नव्हे तर तरूणीही फिदा झाल्या. विराटची फलंदाजीची स्टाईल, त्याचा मैदानावरील अँटीट्यूड तरुणींना नेहमीच भावतो.

4 / 9

काही वर्षांपूर्वी २०१४ मध्ये विराट कोहलीला डॅनियल व्हॅट नावाच्या एका सौंदर्यवतीने लग्नाची मागणी घातली होती. ती स्वत: एक प्रतिभावान क्रिकेटपटूही आहे.

5 / 9

या प्रपोझलबद्दल तिने १० वर्षांनी स्पष्टीकरण दिलंय. जगभरातील तरूणी विराटवर फिदा आहेत, पण कोहलीला प्रपोझ करणं हा जोक होता असं ती म्हणालीय.

6 / 9

'विराटला प्रपोज करणं हा निव्वळ विनोद होता. पण त्या गोष्टीची अपेक्षेपेक्षा खूप जास्त चर्चा रंगली. माझ्या मनात विराटबद्दल तशा भावनाच नव्हत्या.'

7 / 9

'विराटने तेव्हा एक अप्रतिम इनिंग खेळली होती. त्या इनिंगच्या मी प्रेमात पडले आणि त्या नादात मी त्याला लग्नाची मागणी घातली. तो जोकच होता.'

8 / 9

'५० मिनिटांनी जेव्हा मी फोन पाहिला तेव्हा मात्र हा प्रकार काहीच्या काही व्हायरल झाला होता. मला अपेक्षाही नव्हती पण मिडियात हीच चर्चा होती.'

9 / 9

'माझं प्रपोझल इतकं व्हायरल झालं की मी शांत बसून मजा घेत राहिले. मी काहीच बोलले नाही. पण आता मात्र मी सांगतेय की तो केवळ एक जोक होता.'

टॅग्स :विराट कोहलीइंग्लंडऑफ द फिल्ड