हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्न करतोय? माहिका शर्मासोबतच्या 'सीक्रेट वेडिंग'ची तुफान चर्चा!

Hardik Pandya and Mahieka Sharma Wedding News: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.

हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्याशी २२ मे रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, याबाबत हार्दिक पांड्या किंवा माहिका शर्मा यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

हार्दिक पांड्याचे पहिले लग्न मे २०२० मध्ये नताशा स्तानकोव्हिकशी झाले. मात्र, चार वर्षांनंतर, जुलै २०२४ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. त्यांना अगस्त्य पांड्या नावाचा एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतरही, हे दोघे आपल्या मुलाचे संगोपन एकत्रितपणे करत आहेत.

एकीकडे, हार्दिकचे वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय बनले असताना, दुसरीकडे तो क्रिकेटच्या मैदानावरही एका कठीण टप्प्यातून जात आहे. दुखापतीमुळे तो गेल्या दोन सामन्यांपासूनन मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे.

हार्दिक पांड्या कदाचित आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी महिका शर्माशी लग्न करू शकतो, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर हार्दिक पांड्याने महिका शर्माशी विवाह केला, तर तो त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का ठरू शकतो. जरी हार्दिकचा नताशाशी घटस्फोट झाला असला, तरी चाहत्यांच्या मनात त्या जोडप्याबद्दल आजही एक विशेष आपलेपणा आणि प्रेम कायम आहे.