Join us  

IRE vs IND, 2nd T20I : टीम इंडियाच्या धावांमध्ये झाला 'घोळ'; आयर्लंडसमोर ठेवले गेले कमी लक्ष्य, नेमके किती व का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:49 PM

Open in App
1 / 6

Ireland vs India, 2nd T20I : दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला ७ बाद २२७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताच्या या धावसंख्येनुसार आयर्लंडसमोर विजयासाठी २२८ धावांचे लक्ष्य असणे अपेक्षित होते. पण, काहीतरी घोळ झाला अन् आयर्लंडसमोर कमी धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले.

2 / 6

दीपकने ५७ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. संजूने मिळालेल्या संधीचं सोनं करताना ४२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावा केल्या. त्याने दीपकह ८७ चेंडूंत १७६ धावांची भागीदारी केली आणि ही ट्वेंटी-२०तील भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली.

3 / 6

दीपकची १०४ धावांची खेळी ही आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सूर्यकुमार यादव ( १५) दिनेश कार्तिक ( ०), अक्षर पटेल ( ०) व हर्षल पटेल ( ०) हे झटपट बाद झाले. भारताने ७ बाद २२७ धावा केल्या. रोहित शर्मा (४), लोकेश राहुल ( २), सुरेश रैना ( १) यांनी ट्वेंटी-२०त शतक झळकावले आहेत.

4 / 6

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी दीपक-संजूने १७६ धावा करून सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. त्यांनी इंग्लंडच्या जोस बटलर व डेवीड मलान यांचा १६७* ( वि. दक्षिण आफ्रिका, २०२०) धावांचा विक्रम मोडला.

5 / 6

प्रत्युत्तरात आयर्लंडकडून आक्रमक सुरुवात झाली. अनुभवी पॉल स्टर्लिंग व कर्णधार अँडी बॉलबर्नी यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ७३ धावा चोपल्या. स्टर्लिंगने १८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा कुटल्या. रवी बिश्नोनीने त्याला सहाव्या षटकात बाद केले. त्यानंतर अँडीची फटकेबाजी सुरू झाली आणि आयर्लंडने ९ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या आहेत.

6 / 6

२०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने फटका मारला, पण त्यावेळी त्याने दोन धावा काढल्याचे सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात त्या चेंडूवर एकही धावा आलेली नव्हती. त्यामुळे भारताच्या २२७ धावांतून दोन धावा वजा करून आयर्लंडसमोर २२६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

टॅग्स :भारतआयर्लंड
Open in App