Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार क्रिकेटरचा साखरपुडा; कोण आहे त्याच्या 'दिलाची राणी'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 20:54 IST

Open in App
1 / 10

ट्रेड विंडोच्या माध्यमातून CSK च्या ताफ्यातून RR च्या संघात सामील झालेल्या इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम करन याने लाँग टाइम गर्लफ्रेंड इझाबेला ग्रेस सायमंड्स–विलमॉट हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे.

2 / 10

स्टार क्रिकेटरनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रोमँण्टिक फोटो शेअर करत साखरपुडा उरकल्याची घोषणा केली आहे.

3 / 10

सॅम करन याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये गुडघ्यावर बसून लाँग टाइम गर्लफ्रेंडला एंगेजमेंट रिंग दिली.

4 / 10

सॅम करन याने प्रपोज केल्यावर ती लाजून गोरी मोरी झाल्याचे या फोटोत दिसून येते. दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सची 'बरसात' होताना दिसत आहे.

5 / 10

सॅम करनची होणारी पत्नी इझाबेला ग्रेस सायमंड्स ही मूळची लंडनची आहे. २०१९ च्या हंगामात ती आयपीएलमध्ये सॅम करन याला चीअर करण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा भारतात आली होती. त्यावेळी सॅम प्रितीच्या पंजाबकडून खेळताना दिसला होता.

6 / 10

सॅमनं दिलाची राणी झालेली इझाबेला ग्रेस सायमंड्स ही पेशाने एक लेखिका आणि अभिनेत्री आहे. ती भटकंतीचा छंदही जोपासते.

7 / 10

क्रिकेटरनं एकमेकांवरील प्रेमात बुडालेला खास क्षण दाखवणारा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.

8 / 10

या आधीही क्रिकेटरनं 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..' या अंदाजात हॉट अँण्ड बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

9 / 10

ती अन् तो सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून खास फ्रेमसह एकमेकांमधील स्टाँग बॉन्डिंगची झलक दाखवून देतानाही पाहायला मिळाले आहे.

10 / 10

सॅम करन प्रितीच्या पंजाबच्या संघात असताना दोघांच्यात सुरु असलेल्या डेटिंगची चर्चा आणि प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहालच्या परिसरातील ही फ्रेम चांगलीच गाजली होती.

टॅग्स :ऑफ द फिल्डइंग्लंडराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४पंजाब किंग्स