इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ च्या हंगामासाठी मेगाऑक्शन सुरू आहे. पहिल्या दिवशीच्या लिलावामध्ये एकूण ९७ खेळाडूंवर बोली लागली. सर्व दहा फ्रँचायझींनी खेळाडूंची खरेदी केली. मात्र या लिलावामध्ये दोन स्टार महिला अँकरनी आपल्या अदांमुळे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
या दोन स्टार अँकर आहेत दिशा ओबेरॉय आणि भावना बालाकृष्णन. दिल्लीतील राहणारी दिशा ओबेरॉय ही माजी आरजे आहे. तर चेन्नईतील रहिवासी भावना ही कॉमेंट्रेटर आहे.
मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन, शाहरूख खानची कन्या सुहाना आणि जुही चावलाची कन्या जान्हवी मेहता यासुद्धा उपस्थित होत्या. तरीही अँकर दिशा ओबेरॉय आणि भावना बालाकृष्णन यांचा जलवा कमी झाला नाही.
३६ वर्षांची भावना बालाकृष्ण विवाहित आहे. तिच्या पतीचे नाव निखील रमेश आहे. भावना हिला व्हीजे भावना या नावाने ओळखले जाते. ती एक टीव्ही अँकर, क्रिकेट कॉमेंट्रेटर, व्हीडिओ जॉकी, प्लेबॅक सिंगर आणि डान्सरसु्द्धा आहे.
व्हीजे भावना मोस्ट पॉप्युलर स्पोर्ट्स जर्नलिस्टपैकी एक आहे. दिग्गज महिला स्पोर्ट्स पत्रकारांमध्ये मयंती लँगर हिच्यानंतर व्हिजे भावनाता उल्लेख केला जातो. सोशल मीडियावरसुद्धा भावना सातत्याने अॅक्टिव्ह असते. त्यांचे लाखो फॅन्स आहेत.
तर दिशा ओबेरॉय एक फेमस रेडिओ जॉकी आहे. तिला रेड एफएण ९३.५ वर आरजे म्हणून काम केले आहे. तिथूनच तिला खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने अँकरींगच्या दुनियेत पाऊल ठेवले होते.
दिशा ओबेरॉय हिला २०२०मध्ये नॅशनल मीडिया अॅवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले होते. रेडियोच्या जगात चांगले काम करण्यासाठी दिशी ओबेरॉय ला गेल्यावर्षी KWAA अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.