Join us  

SRH vs MI: मुंबईच्या ५ चुकांमुळे हैदराबादने केल्या विक्रमी २७७ धावा, हार्दिकची चूक भोवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:28 PM

Open in App
1 / 11

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याची आयपीएलच्या इतिहासात नोंद केली जाईल यात शंका नाही. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर यजमान संघाने ऐतिहासिक कामगिरी केली.

2 / 11

सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या म्हणून हैदराबादच्या संघाने इतिहास रचला. खरं तर मुंबईच्या काही प्रमुख चुकांमुळे पाहुण्यांनी लाजिरवाणी कामगिरी केली.

3 / 11

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन या त्रिकुटाने हार्दिकसेनेची चांगलीच धुलाई केली. अखेरच्या काही षटकांमध्ये एडन मार्करमचे वादळ आले.

4 / 11

विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करून हैदराबादच्या संघाने इतिहास रचला. मुंबईसमोर विजयासाठी तब्बल २७८ धावांचे आव्हान ठेवले. यजमान हैदराबादने निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या.

5 / 11

मंयक अग्रवाल (११) स्वस्तात बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी स्फोटक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. हेडने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ६२ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावा कुटल्या.

6 / 11

मग एडन मार्करम आणि हेनरिक क्लासेन यांनी देखील हात साफ केले. एडन मार्करमने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ८० धावा कुटल्या आणि ऐतिहासिक धावसंख्या उभारली.

7 / 11

हार्दिककने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघात स्टार जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज असताना देखील पांड्याने पदार्पण करत असलेल्या नवख्या गोलंदाजाकडे नवीन चेंडू सोपवला. १७ वर्षीय क्वेना महाकाची चांगली धुलाई करत हैदराबादने त्याच्या ४ षटकांत ६६ धावा काढल्या.

8 / 11

पहिल्या षटकापासूनच यजमान संघाचे फलंदाज तुटून पडले होते. पण, बुमराहला डावाचे चौथे षटक टाकण्याची संधी मिळाली. बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत हेडला शांत ठेवले. पण, बुमराहने त्याची दोन षटके टाकल्यानंतर तो बराच वेळ चेंडूपासून दूर राहिला.

9 / 11

हार्दिकच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडचा एक सोपा झेल सुटला जो मुंबईला चांगलाच महागात पडला. हेडने जीवनदान मिळताच या संधीचे सोने केले.

10 / 11

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने देखील हार्दिकच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केले. फिरकीपटूंना मार पडत असताना हार्दिकने जसप्रीत बुमराहवर विश्वास न दाखवल्याने पठाणने नाराजी व्यक्त केली.

11 / 11

गोलंदाजांची सुरुवातीपासूनच धुलाई झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन खचल्याचे दिसले. नो बॉल आणि अतिरिक्त धावांची मदत घेत यजमानांनी २७७ पर्यंत मजल मारली.

टॅग्स :हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४जसप्रित बुमराह