Join us  

Mohsin Khan, IPL 2023: "तर माझा हात कापावा लागला असता..."; मुंबई इंडियन्सला हरवणाऱ्या मोहसीन खानने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 5:32 PM

Open in App
1 / 6

Mohsin Khan Emotional Story: लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) वेगवान गोलंदाज मोहसीन खानने मंगळवारी रात्री इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवला. विजयानंतर आपल्या आजाराचा संदर्भ देत त्याने सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्याचा चक्क हात कापावा लागला असता.

2 / 6

अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी 11 धावांची गरज होती. क्रीजवर टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनसारखे आक्रमक फलंदाज होते, पण मोहसीनने शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनौचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या जवळ पोहोचला.

3 / 6

मोहसीनने वेगवान व शिस्तबद्ध गोलंदाजी केली. पण एक काळ असा होता की जेव्हा त्याला क्रिकेट सोडावे लागते की काय असे वाटत होते. तसेच त्याचा हातही कापावा लागेल की काय असे वाटत होते. त्यानेच याबाबत सांगितले.

4 / 6

'गेल्या वर्षी माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. माझ्या डाव्या खांद्याजवळ रक्त गोठले होते. या शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण देशांतर्गत हंगाम आणि आयपीएलचे सुरुवातीचे सामने मी खेळू शकलो नव्हतो. एक काळ असा होता की मी क्रिकेट खेळण्याचा विश्वास सोडला होता'

5 / 6

'माझा मधल्या काळात हातही उचलता येत नव्हता. खूप प्रयत्न करून कसातरी हात वर करायचो, मग सरळ होत नव्हता. कोणत्याही क्रिकेटपटूला हा आजार नसावा. हा एक विचित्र प्रकारचा आजार होता, माझ्या धमन्या पूर्णपणे बंद होत्या. त्यांच्यात रक्त गोठले होते. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA), राजीव शुक्ला सर, फ्रेंचाइजी (लखनौ सुपर जायंट्स), माझ्या कुटुंबाने या कठीण काळात खूप साथ दिली.

6 / 6

'मी एका वैद्यकीय आजाराचा बळी ठरलो होतो. तो काळ आठवून मला भीती वाटते, कारण डॉक्टरांनी सांगितले होते की जर मी शस्त्रक्रिया आणखी एक महिना लांबवली असती तर माझा हातही कापावा लागू शकला असता,' असे मोहसीनने सांगितले.

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्समुंबई इंडियन्सडॉक्टर
Open in App