Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL मधून 'हे' ५ दिग्गज संघ का गायब झाले? एक तर विजेता..., पुण्याचे दोन संघ होते, वाचा रंजक इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:16 IST

Open in App
1 / 6

क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे! जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १९ व्या हंगामाचा थरार २८ मार्च पासून सुरू होत आहे. सलामीची लढत बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. या हंगामात एकूण १० संघ मैदानात उतरणार आहेत.

2 / 6

मात्र, आयपीएलच्या १८ वर्षांच्या प्रवासात असे ५ संघ होते, जे एकेकाळी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होते, पण आज ते इतिहासात जमा झाले आहेत. जाणून घेऊया या संघांच्या पडद्यामागची खरी कारणे:

3 / 6

डेक्कन चार्जर्सची कथा सर्वात अजब आहे. २००८ मध्ये गुणतालिकेत तळाला असलेला हा संघ २००९ मध्ये ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली थेट चॅम्पियन बनला. मात्र, २०१२ मध्ये आर्थिक संकटामुळे आणि बँक गॅरंटी देण्यास एका दिवसाचा उशीर झाल्यामुळे बीसीसीआयने त्यांचा करार संपवला. २०१३ मध्ये त्यांची जागा सनरायझर्स हैदराबादने घेतली.

4 / 6

२०११ मध्ये महेला जयवर्धने, ब्रेंडन मॅक्युलम आणि रवींद्र जडेजासारखे स्टार खेळाडू असूनही मालकांमधील वाद आणि १५६ कोटींची बँक गॅरंटी न भरल्यामुळे या संघाचा प्रवास एका वर्षातच संपला. कोर्टाने बीबीसीआयला ८०० कोटींचा दंड ठोठावला परंतू पुन्हा काही हा संघ आयपीएलमध्ये दिसला नाही.

5 / 6

सहारा ग्रुपने हा संघ तब्बल ३००० कोटींना विकत घेतला होता. सौरव गांगुली आणि युवराज सिंगसारखे मोठे नाव असूनही या संघाला कधीही प्ले-ऑफ गाठता आले नाही. बीसीसीआयसोबत फ्रेंचायझी फीवरून झालेल्या वादामुळे सुब्रत रॉय यांनी २०१३ मध्ये या संघाला स्पर्धेतून बाहेर काढले.

6 / 6

२०१६-१७ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर बंदी असताना हे दोन संघ तात्पुरते आले होते. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्स आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील पुण्याने (ज्याने २०१७ मध्ये फायनल गाठली होती) प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पण २०१८ मध्ये मूळ संघांच्या पुनरागमनासह हे संघ कायमचे बंद झाले.

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल २०२६