Deepak Chahar Wedding Photos: विवाहबंधनात अडकला दीपक चाहर, जया भराद्वाजसह घेतले सात फेरे

आयपीएल २०२२ (IPL 2022) नंतर क्रिकेटपटू दीपक चहरचा (Deepak chahar) विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आयपीएल २०२२ (IPL 2022) नंतर क्रिकेटपटू दीपक चहरचा (Deepak chahar) विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने १ जून २०२२ रोजी त्याची मैत्रीण जया भारद्वाजसोबत (jaya Bhardwaj) सात फेरे घेतले.

सध्या त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दीपक पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केलेली दिसत आहे, त्याच जयाने रॉयल वेडिंग लूक देखील कॅरी केला आहे.

दीर्घकाळाच्या रिलेशनशीपनंतर दीपक चाहर आणि त्याची मैत्रीण जया भारद्वाज यांनी १ जून रोजी लग्नगाठ बांधली. फतेहाबाद येथील जेपी पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यापूर्वी मंगळवारी मेहंदीचा कार्यक्रम आणि संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार रात्री १० वाजता विवाहसोहळा पार पडला. यादरम्यान, दीपक चाहरचे वडिल लोकेंद्रसिंह चाहर, काका देशराज चाहर आणि भाऊ राहुल चाहर, बहीण मालती यांनी उपस्थित पाहुण्यांसोबत डान्सही केला.

यापूर्वी मेहेंदी आणि संगीताच्या कार्यक्रमात दीपक चाहर आणि जया यांचा स्वदेशी लूक लोकांना भरपूर आवडला. लग्नासाठी दोघांनी मनिष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेले आउटफिट परिधान केले होते.

दोनशे ते अडीचशे लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर दोघांची ग्रँड रिसेप्शन पार्टी ३ जूनला दिल्लीत देण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडूही सहभागी होतील.

दीपक चाहनं गेल्या वर्षी आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये जयाला प्रपोज केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष एमेकांना डेट करत होते. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान अनेकदा जया दीपक चाहरला सपोर्ट करतानाही दिसत होती.

जया भारद्वाज कॉर्पोरेटमध्ये कार्यरत आहे. तिनं मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण घेतलं आहे. ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले फोटो शेअरही करत असते.