IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...

Tymal Mills News: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेला इंग्लिश क्रिकेटपटू टायमल मिल्स याने पोर्न साईटवर आपलं अकाऊंट उघडलं आहे. या साईटवर टायमर मिल्सला पाहून क्रिकेटप्रेमी अवाक् झाले आहेत.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेला इंग्लिश क्रिकेटपटू टायमल मिल्स याने पोर्न साईटवर आपलं अकाऊंट उघडलं आहे. या साईटवर टायमर मिल्सला पाहून क्रिकेटप्रेमी अवाक् झाले आहेत.

अशा साईटवर अकाऊंट उघडणारा टायमल मिल्स हा पहिला क्रिकेटपटू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, टायमल मिल्स याने पोर्न साईटवर येण्याच्या आपल्या निर्णयामागचं कारणंही सांगितलं आहे.

या निर्णयामुळे लोक माझ्याबद्दल काय बोलतात याची कल्पना मला आहे, असे त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

तो म्हणाला की, मी ज्या साईटवर आलो आहे, तिला लोक पोर्न साईट म्हणून ओळखतात, हे मला माहिती आहे. मात्र मी इथे तसलं काहीही करणार नाही आहे.

यामध्ये कुठलेही ग्लॅमर किंवा अश्लील फोटो नसलीत हे मी आधीच स्पष्ट करून ठेवतोय. इथे केवळ क्रिकेट आणि माझ्या जीवनाशी संबंधित गोष्टी असेल. हा एक नवा मार्ग आहे. मात्र त्यासाठी मी खूप उत्साहित आहे, असेही त्याने सांगितले.

३२ वर्षीय टायमल मिल्स याला प्रसारमाध्यमांचं नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. टायमल मिल्सला जेव्हा एसेक्सकडून खेळण्यासाठी पहिल्यांदा करारबद्ध करण्यात आले तेव्हा तो युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन येथून स्पोर्ट्स जर्नेलिझमचं शिक्षण घेत होता.

२०१७ साली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला लिलावात तब्बल १२ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते. त्या हंगामात मिल्स ५ सामने खेळला होता. तसे त्याला ५ विकेट्स मिळाल्या होत्या.

२०२२ च्या आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्या हंगामात मिल्स याने ५ सामन्यात सहा बळी मिळवले होते.

टायमल मिल्स इंग्लंडकडून १६ टी-२० सामने खेळला आहे. त्यात त्याने १४ बळी टिपले आहेत.