श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची काहीवर्षांपूर्वी दहशत होती. आपल्या गोलंदाजीने तो भल्या भल्या संघांची दाणादाण उडवायचा पण आज आयपीएलच्या लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही.
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही कोणीही विकत घेतले नाही. त्याची बेस प्राईस 75 लाख रुपये होती.
अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा जोश हेझलवूडही अनसोल्ड राहिला.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनलाही कोणीही विकत घेतले नाही.
स्विंग गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणा-या टीम साऊदीवर सुद्धा कोणीही बोली लावली नाही.