Join us  

IPL Auction 2024: IPL मध्ये कमिन्सच्या एका चेंडूची किंमत ६.१ लाख रुपये; स्टार्क तर 'सुसाट'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 7:30 PM

Open in App
1 / 10

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग असलेली आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.

2 / 10

मंगळवारी दुबईत आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बक्कळ कमाई करत इतिहास रचला. डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर पॅट कमिन्सने विक्रम रचत २०.५० कोटींचा गल्ला जमवला.

3 / 10

तर, मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने तब्बल २४.७५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर विक्रमी बोली लागली.

4 / 10

आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंवर २० कोटी रूपयांची बोली लागली. याआधी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करन होता. आयपीएल २०२३ च्या लिलावात पंजाब किंग्सने सॅम करनला १८.५० कोटी रुपयांत खरेदी केले होते.

5 / 10

जर पॅट कमिन्सने सनरायझर्स हैदराबादसाठी साखळी फेरीतील सर्व १४ सामने खेळले तर तो त्याच्या कोट्यातील ४ षटके म्हणजेच ३३६ चेंडू टाकेल. अशा परिस्थितीत पॅट कमिन्सच्या एका चेंडूची किंमत ६.१ लाख रुपये असेल.

6 / 10

पण जर सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरी गाठली आणि पॅट कमिन्सने सर्व सामने खेळले तर ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या एका चेंडूची किंमत पाच लाख रुपये होईल.

7 / 10

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्व सामने खेळेल असे अपेक्षित आहे. जर मिचेल स्टार्क १४ सामन्यांत खेळला तर तो देखील चार षटके म्हणजे ३३६ चेंडू टाकेल.

8 / 10

अशा प्रकारे मिचेल स्टार्कच्या एका चेंडूची किंमत तब्बल ७.४० लाख रुपये असेल. पण जर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर मिचेल स्टार्क जास्तीत जास्त १७ सामने खेळू शकेल.

9 / 10

केकेआरने अंतिम फेरी गाठल्यास स्टार्क एकूण ४०८ चेंडू टाकू शकेल. असे झाल्यास मिचेल स्टार्कच्या एका चेंडूची किंमत ६.१ लाख रुपये एवढी असेल.

10 / 10

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२३आॅस्ट्रेलियाकोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद