Join us
Daily Top 2Weekly Top 5

KL राहुलनं साधला मोठा डाव! किंग कोहलीला मागे टाकत एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 18:24 IST

Open in App
1 / 8

भारताचा स्टायलिश बॅटर लोकेश राहुल याने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली.

2 / 8

इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामात लोकेश राहुल कमालीच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. राजस्थानने सेट केलेल्या विक्रमी २२६ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याने ७५ धावांची मॅच विनिंग खेळी केली.

3 / 8

या खेळीसह त्याने यंदाच्या हंगामता सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपवरही कब्जा केला.

4 / 8

लोकेश राहुलनं ११व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. IPL मध्ये राजस्थान विरुद्ध त्याने आठव्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा खास विक्रम नोंदवला.

5 / 8

KL राहुलनं १८ डावात ही कामगिरी करत एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी साधली.

6 / 8

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं RCB कडून खेळताना एबीनं राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संघाविरुद्ध २० डावात ही कामगिरी नोंदवली होती.

7 / 8

माजी क्रिकेटर शिखर धवनने राजस्थान रॉयल्स विरुद्ध २४ डावात सात वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

8 / 8

आरसीबीचा स्टार बॅटर विराट कोहलीनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३३ डावात ७ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :आयपीएल २०२६लोकेश राहुलविराट कोहलीएबी डिव्हिलियर्स