Join us  

IPL मधून निवृत्ती घेतलेल्यांची Playing XI पाहिलीत का?, गंभीर कॅप्टन, तर सचिन सलामीवीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 4:43 PM

Open in App
1 / 12

आयपीएल स्पर्धेचं यंदाच्या १४ वं सत्र सुरू आहे. जगातील सर्वोत्तम टी-२० लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. आजवर अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत कमालीचे विक्रम रचलेत. तर आजवर अनेक खेळाडू निवृत्त देखील झालेत. पण त्यांनी या स्पर्धेत केलेली कामगिरी कधीच निवृत्त होऊ शकत नाही.

2 / 12

आयपीएलमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंपैकी सर्वोत्तम संघ कसा असेल असा जर विचार करायचा झाल्यास कोणकोणत्या खेळाडूंची निवड केली जाईल असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर जाणून घेऊयात निवृत्त खेळाडूंचा आयपीएल संघ कसा असेल.

3 / 12

निवृत्त खेळाडूंच्या आयपीएल संघाच्या नेतृत्वाखाली गौतम गंभीरची निवड करण्यात आलीय. गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकर संघात सलामीवीर म्हणून निवडले गेले आहेत. दोघांचाही आयपीएलमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. गंभीरनं आयपीएलमध्ये एकूण ३६ अर्धशतकं ठोकलीत. तर सचिननं १३ अर्धशतकं आणि एका शतकाचा देखील समावेश आहे.

4 / 12

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याला यष्टीरक्षक आणि संघातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून जागा देण्यात आलीय. संगकारानं आयपीएलमध्ये ७१ सामन्यांमध्ये १० अर्थशतकं आणि १६८७ धावा केल्या आहेत.

5 / 12

संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस याची निवड करण्यात आलीय. कॅलिसनं आयपीएलमध्ये ९८ सामन्यांमध्ये १७ अर्धशतकांच्या जोरावर २४२७ धावा कुटल्या आहेत. तर ६५ विकेट्स देखील मिळवल्या आहेत.

6 / 12

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याला संघात पाचव्या क्रमांचा फलंदाज आणि मॅच फिनिशर खेळाडू म्हणून जागा देण्यात आलीय. युवराजनं आयपीएलमध्ये १३ अर्धशतकं ठोकली आहेत. तर ३६ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

7 / 12

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू एल्बी मॉर्केल याला संघात सहव्या क्रमांकाचं स्थान देण्यात आलं आहे. तडाखेबाज फलंदाजी आणि उत्तम गोलंदाजीसाठी एल्बी मॉर्केल ओळखला जात होता. एल्बीनं आयपीएलमध्ये १४० च्या स्ट्राइकरेटनं फलंदाजी केलीय. याशिवाय ९५ बळी देखील घेतले आहेत.

8 / 12

आयपीएलच्या निवृत्त खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू रजत भाटिया याला देखील स्थान देण्यात आलं आहे. रजत भाटियानं आयपीएलमध्ये ७१ विकेट्स घेतल्यात, तर १२० च्या स्ट्राइकरेटनं ३४२ धावा देखील केल्या आहेत.

9 / 12

संघात फिरकीपटूसाठी भारताचे महान गोलंदाज अनिल कुंबळे यांना स्थान देण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये अनिल कुंबळे यांनी फक्त ४२ सामने खेळले आहेत. यात त्यांनी ४५ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, केवळ पाच धावा देऊन पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे.

10 / 12

क्रिकेट विश्वातील महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांनाही संघात स्थान देण्यात आलंय. मुरलीधरन यांनी आयपीएलमध्ये ६६ सामने खेळले असून ६३ बळी घेतले आहेत.

11 / 12

संघात १० व्या क्रमांकासाठी वेगवान गोलंदाज आरपी सिंह याचा समावेश करण्यात आलाय. स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या आर.पी.सिंहनं आयपीएलमध्ये ८२ सामन्यांमध्ये ९० विकेट्स घेतल्या आहेत. २००९ सालच्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजासाठी दिली जाणारी पर्पल कॅप आरपी सिंहनं पटकावली होती.

12 / 12

निवृत्त खेळाडूंच्या बेस्ट आयपीएल संघात वेगवान गोलंदाजीची धुरा भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याच्याकडे देण्यात आली आहे. नेहरानं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया, चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजी केली आहे. नेहरानं आयपीएलमध्ये एकूण ८८ सामन्यांमध्ये १०६ बळी घेतले आहेत. लीग स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये नेहराचा ११ वा क्रमांक लागतो. (Note: वरील प्लेइंग इलेव्हन बीसीसीआय किंवा इतर कोणत्याही क्रिकेट संस्थेनं निवडलेली नाही)

टॅग्स :आयपीएल २०२१गौतम गंभीरसचिन तेंडुलकरअनिल कुंबळेकुमार संगकारा