IPL Unique Record : किंग कोहलीनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम; जाणून घ्या सविस्तर

विराट कोहलीनं हिटमॅन रोहितला टाकले मागे, या खास विक्रमाला घातली गवसणी

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सक्रीय असताना छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत एकमेकांना तगडी फाईट देणारे विराट कोहली आणि रोहित शर्मा आता आयपीएलमध्ये एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच प्रतिनिधीत्व करणाऱ्या विराट कोहलीनं यंदाच्या हंगामात आणखी एक खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

आयपीएलच्या १९ व्या हंगामात रोहित शर्मानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात एका संघा विरुद्ध सर्वाधिक ११६१ धावा करत खास विक्रम नोंदवला होता.

आता विराट कोहलीनं चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात २८ धावांच्या खेळीसह त्याचा हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला आहे. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विराट कोहलीच्या खात्यात ११७४ धावा जमा आहेत.

यंदाच्या हंगामात २० मे रोजी मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध साखळी फेरीत आणखी एक सामना खेळणार आहे. या सामन्यात रोहित शर्माला पुन्हा एकदा टॉपर होण्याची संधी असेल.

चेन्नई सुपर किंग्सशिवाय विराट कोहलीनं पंजाब किंग्सविरुद्ध ११५९ धावा तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ११३० धावा केल्या आहेत.

या आकडेवारीमुळे यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपला दबदबा कायम ठेवून 'नंबर वन'चा ताज शेवटपर्यंत आपल्याकडे ठेवण्याची संधी आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ८ हजार धावांसह एका हंगामात सर्वाधिक ९७३ धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावे आहे.