वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला

जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत कमी वयात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी अव्वल, इथं पाहा आघाडीच्या पाच फलंदाजांचा रेकॉर्ड

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात १४ चेंडूत ३९ धावांची आक्रमक खेळी केली. ५ षटकारांनी बहरलेल्या या खेळीत त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी याने IPL मध्ये २० वर्षांपेक्षा कमी वयात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

IPL मध्ये धमाक्यावर धमाका करणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं आतापर्यंतच्या आपल्या अल्प कारकिर्दीत जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीग स्पर्धेत ३५ षटकार ठोकले आहेत.

याआधी IPL स्पर्धेत २० वर्षांपेक्षा कमी वयात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ईशान किशन आणि रिषभ पंत या दोघांच्या नावे होता. या दोघांचा विक्रम वैभव सूर्यवंशीनं मोडीत काढला.

टीम इंडियाचा विकेट किपर बॅटर आणि यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणारा ईशान किशन याने वयाची विशी पार करण्याआधी IPL मध्ये ३० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

संजू सॅमसन या यादीत आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये आहे. २० वर्षांच्या आत त्याने IPL मध्ये २२ षटकार मारले होते.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असलेला पृथ्वी शॉ IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या युवा बॅटरच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने १९ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.