Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तू माझ्या आयुष्यातील..." रितिकानं रिपीट केली हिटमॅन रोहितसोबतची 'प्यारवाली' स्टोरी

By सुशांत जाधव | Updated: April 30, 2026 17:56 IST

Open in App
1 / 7

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी त्याची पत्नी रितिका सजदेह हिने खास पोस्ट शेअर केली आहे.

2 / 7

हिटमॅन रोहित शर्माला ३९ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रितिकाने काही खास फोटो शेअर करताना त्याच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.

3 / 7

तिने खास पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'तू माझा सर्वात चांगला मित्र, माझा सोलमेट आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहेस.'

4 / 7

रितिकाची पोस्ट नवी असली तरी त्यात जो कंटेट आहे तो जुनाच आहे. मी प्रत्येक वर्षी तुझ्याबद्दल हेच सांगत आले आहे, असा उल्लेख करत तिने दोघांच्या नात्यातील खास बॉन्डिंगची गोष्ट शेअर केली आहे.

5 / 7

रोहित आणि रितिका यांची लव्ह स्टोरी एकदम खास आहे. स्पोर्ट्स इवेंट मॅनेजर असलेल्या रितिकाला रोहित एका जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटला होता. आधी दोघांच्या मैत्री झाली अन् मग दोघांच्यात प्रेम फुलले.

6 / 7

पाच ते सहा वर्षे एकमेकांसोबत डेट केल्यावर मुंबईतील बोरीवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रोहितनं रितिकाला अगदी गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते.

7 / 7

३ जून २०१५ रोजी साखरपुडा उरकल्यावर १३ डिसेंबर २०१५ मध्ये ही जोडी विवाह बंधनात अडकली होती.

टॅग्स :रोहित शर्माऑफ द फिल्ड