Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mukul Choudhary Records : IPL मधील नवा फिनिशर! मुकुल चौधरीनं एका डावात दोन विक्रमांसह रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:09 IST

Open in App
1 / 8

टी २० क्रिकेटमधील अल्प अनुभवी मुकुल चौधरीनं तुफान फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या मैदानात IPL मधील पहिल्या अर्धशतकासह त्याने एका डावात दोन खास विक्रमांना गवसणी घातली.

2 / 8

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात LSG च्या संघाला धावांचा पाठलाग करताना अविश्वसनीय विजय मिळवून देताना त्याने २०० च्या स्ट्राईक रेटसह २७ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली.

3 / 8

LSG च्या संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक ७ षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

4 / 8

मुकुल चौधरीनं सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक ७ षटकार मारत ड्वेन ब्रावोच्या खास विक्रमाशी बरोबरी साधली.

5 / 8

फक्त १० टी-२० सामन्याचा अनुभव असलेल्या मुकुल चौधरीनं वादळी अर्धशतकासह LSG च्या संघाकडून फिनिशरच्या रुपात यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत.

6 / 8

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना ड्वेन ब्रावोनं २०१८ च्या हंगामात मुंबई इंडिन्सविरुद्धच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३० चेंडूत ६८ धावांची खेळी साकारताना ७ षटकार मारले होते.

7 / 8

मुकुल चौधरी याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातून IPL मध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने ११ चेंडूत १४ धावांची खेळी केल होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ५ चेंडूत २ धावा करून तो नाबाद राहिला होता.

8 / 8

याशिवाय मुकुल चौधरी याने आवेश खानच्या साथीनं आठव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. IPL च्या इतिहासात आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील ही सर्वोच्च भागीदारी ठरली.

टॅग्स :आयपीएल २०२६इंडियन प्रीमिअर लीगलखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स